बोरीवली - परदेशात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या चार दलालांविरोधात बोरीवली पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी सुभाष मानुसरे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन महिलांचाही यामध्ये समावेश असून त्या अद्याप फरार असल्याची माहिती बोरीवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणाजी सावंत यांनी दिली.
या आरोपींनी चायनातल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये नोकरी लावून देण्याचं सांगत बनावट कागदपत्र तयार करून प्रशांत पोलेसर या व्यक्तीला चार लाखांचा गंडा घातला होता. आरोपींनी यापूर्वी 50 जणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचंही पोलिसांनी सांगितले.