कोरोना संकटकाळात बांगलादेशात आलेल्या बेरोजगारी आणि भूकबळीमुळे अनेक बांगलादेशींनी भारतात स्थायिक होण्याच्या हेतूने पळ काढला. मात्र आता भारतातच स्थायिक होण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या घुसखोरांनी राज्यातील एका आमदाराच्या लेटर हॅडचा वापर करत असल्याचे एका पोलिस कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ एजंटसह
हेही वाचाः- महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा बोनस
मुंबईपासून ते नाशिक (Nashik), पुणे, (Pune) नागपूर (Nagpur) आणि भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व ( Indian citizenship) मिळवून देण्याकरता बनावट सरकारी दस्तावेजांचा वापर केला जात असल्याची धक्कादायकबाब पोलिसांच्या कारवाईतून समोर आली. बनावट सरकारी दस्तावेज बनवण्याकरता आमदारांच्या लेटर हेडचा वापर केला जात होता. कुणीही या भारताचे नागरिकत्व घ्या, कोणतीही अट नाही. प्रतिबंधित देशांच्या नागरिकांनाही भारतात सहज नागरिकत्व दिलं जाणार, दिलं जाणार नाही तर दिलं जातंय आणि ते ही सर्व कायदे पायदळी तुडवून. मुंबई पोलिसांनी १५५ आधार कार्ड, ३४ पासपोर्ट, २८ पेन कार्ड, ८ रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, १८७ बँक आणि पोस्टाचे पास बुक, १९ रबर स्टॅम्प आणि २९ शाळा सोडल्याचे दाखले जप्त केले आहेत ही सर्व कागदपत्रे बनावट आहेत आणि धक्कादायक म्हणजे, या सरकारी दस्ताऐवज ज्यांचे आहेत ते भारतीय नागरिक नसून बांग्लादेशी नागरिक आहेत. मुंबई पोलिसांच्या साकीनाका पोलिसांनी अटक केलेल्या २ एजंटकडून हा धक्कादायक खुलासा झाला.
हेही वाचाः- दिवसभरात ५८ पोलिस कोरोनाबाधित, आतापर्यंत २८४ पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
या २ एजंटकडून साकीनाका पोलिसांनी ७ लेटर हेड जप्त केलेत, जे राज्यातील एका आमदाराच्या नावे आहेत. ज्यांच्या साह्यायाने बांग्लादेशी नागरिकांना रेशनकार्ड, बॅंक खाते आणि पोस्टातील खाती उघडून त्यांचे प्राथमिक सरकारी दस्तावेज बनवले जात होते. आणि याच बनावट प्राथमिक सरकारी दस्तावेजांचा वापर करुन आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्र बनवले जात होते. अर्थात काही पैसे आणि काही दिवसात बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून दिले जात होते. मुंबईपासून ते नाशिक, पुणे, नागपूर आणि भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याकरता बनावट सरकारी दस्तावेजांचा वापर केला जातोय. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असून फक्त बांग्लादेशींना नाही तर अशा देशांच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिलं जातंय जे देश भारतावर दहशतवादी हल्ले करतात. त्यामुळे मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या उबंरठ्यावर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.