प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात देवाच्या दानपेटीत टाकण्यासाठी दिलेले पैसे पुजारीच लंपास करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असल्याने मुंबईकरांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात देवाच्या दानपेटीत टाकण्यासाठी दिलेले पैसे पुजारीच लंपास करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असल्याने मुंबईकरांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचं चित्रीकरण करणाऱ्या तक्रारदाराने या प्रकरणी पोलिसात धाव घेतली असून सर्व पुजाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने चौकशी करण्याची मागणी तक्रारदाने केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यानुसार ९ फेब्रुवारी रोजी तक्रारदार आतिश करंजवणे सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन झाल्यानंतर त्यांनी दानपेटीत दक्षिणा टाकण्यासाठी पुजाऱ्यांजवळ पैसे दिले. हे पैसे घेऊन पुजाऱ्यांनी दानपेटीत न टाकता ते कंबरेच्या सोवळ्यात लपवलं.
ही बाब आतिश यांनी मंदिराचे उपाध्यक्ष रवी जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी पैसे सोवळ्यात ठेवणारे पुजारी चंद्रकात मुळे यांना बोलवलं असता. त्याच्या सोवळ्यात बरीच रक्कम लपवल्याचं आढळून आलं. हे पैसे आपण नंतर दानपेटीत टाकणार असल्याचं मुळे यांनी सांगितलं. याबाबत आतिश यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडे तक्रार नोंदवली असून त्यांनर आतिश यांनी दादर पोलिस ठाण्यात देखील अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
पुन्हा तोच प्रकार
वार्षिक ८० ते ९० कोटी रुपये उत्पन्न असलेल्या सिद्धिविनायक मंदीरात आतिश यांनी पुन्हा काही दिवसांनी भेट दिली असता. त्यावेळी देखील पुजारी पैसे आपल्या कंबरेला लपवपत असताना त्यांना दिसलं. विशेष करून ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांचा मोह या पुजाऱ्यांना अधिक असल्याचं अतिश यांनी सांगितलं. अतिश यांनी मंदिर प्रशासनाकडे आरटीआय टाकून त्या दिवसाच्या सीसीटिव्ही फुटेजची मागणी केली असून लवकरच मुंबई पोलिस आयुक्तालयात तक्रार नोंदवणार असल्याचं आतिश यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.

बघा, पुजाऱ्याची हातचलाखी
अदखलपात्र गुन्ह्याची नोंद