खंडणीखोर तोतया पोलीस गजाआड


खंडणीखोर तोतया पोलीस गजाआड
SHARES

पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणारा सराईत गुन्हेगार निशांत उर्फ सनी प्रवीण परमार (३०) याला मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ ने अटक केली आहे. या तोतया पोलिसावर तब्बल ४० गुन्ह्याची नोंद असून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली त्यानं अनेकदा जेलची हवा देखील खाल्लेली आहे.  


काय आहे प्रकरण?

ऑगस्ट महिन्यात मालवणीतील एका कॉन्ट्रॅक्टरला या सनीने गाठलं. त्याला फोन करून पुणे गुन्हे शाखेतून इन्स्पेक्टर गीते बोलत असल्याचं सांगितलं. "मी तुझ्या माणसाला रिव्हॉल्व्हरसह पकडलं आहे. ५ लाख रुपये दे नाहीतर तुला अटक करेन'', असं म्हणत सनीने या व्यापाऱ्याकडे ५ लाखांची मागणी केली. मात्र या व्यापाऱ्याने न घाबरता थेट मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.

सनी परमार असे गुन्हे करण्यात पटाईत असून तो काहीच महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आल्याची माहिती गुन्हे शाखेला होतीच. त्यांचा सुरूवातीपासून सनीवर संशय होता, त्यानुसार सोमवारी सनी दहिसर चेक नाक्यावर येणार असल्याची त्यांना खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सनीला त्यांनी ताब्यात घेतलं. चौकशीत पोलिसांचा संशय खरा ठरला. मालवणीतील व्यापाऱ्यासह अनेकांना धमकी देऊन लुटल्याचं त्यानं पोलीस चौकशीत कबूल केलं.


कशी करायचा फसवणूक?   

सुरूवातीला तो व्यापाऱ्यांची तसेच ज्वेलर्सची माहिती काढत असे. त्यानंतर पोलीस असल्याची बतावणी करून तो व्यापाऱ्यांना धमकावत असे आणि त्यांच्याकडून वसुली करत असे. व्यापाऱ्याने म्हणण्यावर विश्वास न ठेवल्यास तो थेट स्थानिक पोलीस ठाण्यात फोन करत असे, तिथे देखील आपण पोलीस असल्याचं सांगून त्यांना माहिती काढण्यासाठी थेट व्यापाऱ्याकडे पाठवत असे. आपल्या दुकानात पोलीस आल्याचं बघताच व्यापारी घाबरून त्याला पैसे देत असत. 

मुंबई, ठाणे आणि जळगावात सनीवर ४० गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी त्याला अटक देखील झालेली आहे. मात्र जेलमधून बाहेर आल्यावर तो पुन्हा तेच करत असल्याचं समोर आलं आहे. ६ महिन्यापूर्वी सनीने बाहेर येताच ५ ते ६ जणांची फसवणूक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.



हेही वाचा 

रवी पुजारीच्या शूटर्सना अटक, आरोपींचे शिल्पा शेट्टी कनेक्शन

फोर्टमध्ये सापडला फाटक्या नोटांचा खच!

स्पायडरमॅन टोळी अडकली जाळ्यात!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा