सलमान खानच्या बॉडीगार्डविरोधात का झाला गुन्हा दाखल? वाचा...


सलमान खानच्या बॉडीगार्डविरोधात का झाला गुन्हा दाखल? वाचा...
SHARES

बिग बॉसमधून काढून टाकण्यात आलेल्या झुबेर खानला मी मदत करत आहे, असं केल्यानं मला अंडरवर्ल्डमधून धमक्या येत होत्या. शुक्रवारी दुपारी मला फोन आला, कॉलरने यावेळी आपली ओळख सलमान खानचा बॉडी गार्ड शेरा अशी केली. इतकेच नाही तर मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. असं शबनम शेख नावाच्या महिलेचे म्हणणे आहे. यानंतर शबनम शेख यांनी सलमानचा बॉडीगार्ड शेराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.


का दिली धमकी?

बिग बॉसमध्ये सलमान खान आणि कंटेस्टन्ट झुबेर खान यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर झुबेर खानाला बिग बॉमधून काढून टाकण्यात आलं होत. यावेळी शबनम शेख या झुबेरच्या समर्थनार्थ समोर आल्या होत्या. त्याचबरोबर सलमानने झुबेरला अपशब्ध उच्चारल्याचे म्हणत शबनम शेख यांनी सलमानने झुबेरची माफी मागावी, अशी जाहीर मागणी देखील केली होती. मात्र अशी मागणी करताच शबनम शेख यांना धमक्या येऊ लागल्या होत्या.


झुबेरचे समर्थन केल्याने शबनम यांना धमकी

शुक्रवारी दुपारी एका मोबाईल नंबर वरून शबनम यांना फोन आला "मी सलमानचा बॉडी गार्ड शेरा बोलत असून, आप भाई को क्यो तकलीफ दे रही हो, जो है आपस में सेटल कर लो" असं त्यांना शेराने सांगितले. मात्र शबनम यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. मी सलमान विरोधात तसेच बिग बॉस, कलर्स आणि अॅन्डमोल यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं त्यांनी शेराला सांगितलं. हे ऐकताच शेराचा सूर बदलला आणि शेराने त्यांना अतिशय वाईट शब्दात शिवीगाळ केल्याचं शबनम यांनी खार पोलीस ठाण्याला दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. शेराने घातलेल्या शिव्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग यावेळी शबनम यांनी खार पोलिसांकडे सोपवलं आहे.

शिवीगाळ केल्याप्रकरणी शेराविरोधात भादंवि कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती" खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली आहे.


रवी पुजारीने देखील केला होता फोन

बिग बॉसमधून काढलेल्या कंटेस्टन्ट झुबेर खानचे समर्थन करताच शबनम शेख यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यात गँगस्टर रवी पुजारीने देखील शबनम यांना फोने केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "सलमानशी आपलं देखील पटत नसून मी तुला मदत करेन" असं रवी पुजारीने म्हटल्याचा दावा शबनम यांनी केला आहे.


हेही वाचा -

सलमान खान दाऊदला घाबरत असेल पण मी नाही - जुबैर खान


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा