मुंबई पोलिसांची जे डब्ल्यू मॅरियेट हॉटेलमधील ड्रॅगन फ्लाय पबवर मोठी कारवाई केली आहे. कोव्हिडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल मधील स्टाफ आणि ग्राहकांवर कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. या पार्टीसाठी दिल्ली आणि पंजाबवरून काहीजण आली होती असे बोलले जाते. त्यात क्रिकेटर सुरेश रैना,गायक गुरू रंधावा,सुसेन रोशन खान हेसुद्धा या पार्टीत सहभागी होते अशी पोलिसांची माहिती पोलिसांनी दिली.
परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली गावदेवी पोलीस ठाणे आणि सहार पोलिस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये रात्री उशिरा हाँटेल जेडब्ल्यू मॅरेज मध्ये असणाऱ्या ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये करण्यात आले या कारवाईत एकूण ३४ जणांना ताब्यात घेण्यात आले होते यामध्ये १९ जणं दिल्ली आणि पंजाब मधून मुंबईला आले असल्याची माहिती आहे ए क्लब मध्ये सुरू असलेल्या पार्टीमध्ये काही बडी नाव सुद्धा समाविष्ट होती अशी माहिती आता समोर आलेल्या आहेत क्रिकेटर सुरेश रैना गायक गुरु रंधावा सुसेन खान आणि रॅपर बादशहा सेलिब्रिटी सुद्धा या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. पोलिसांनी या स्थानांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा त्याचबरोबर विविध कलमांतर्गत कारवाई करून ताब्यात घेतलेला होतं आणि त्यानंतर या सीआरपीसी ४१ (अ) अंतर्गत नोटीस बजावून या सगळ्यांना सोडून देण्यात आलेला आहे..
कालच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार रात्री बारा वाजल्यापासून मुंबई त्याचबरोबर महापालिका क्षेत्रांमध्ये रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आले मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या क्लब वरती पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे मोठी कारवाई करण्यात आले. गेल्या काही दिवसापासून महापालिका हद्दीमध्ये मुंबईतल्या विविध भागांमध्ये पालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये पुढच्या नियमांचे तंतोतंत पालन होत नाही शिवाय सोशल डिस्टंसिंग आणि इतर नियमांचा सुद्धा फज्जा उडत असल्याचं पाहायला मिळाले. प्रशासनाने वारंवार आवाहन करून सुद्धा या गोष्टींचं उल्लंघन करणाऱ्या मारुती कारवाईचा सपाटा सुरू आहे. त्याच अनुषंगाने रात्री झालेली ही मोठी कारवाई मनाली जात असून यामध्ये सेलिब्रिटी सहभागी असल्याने भुवया उंचावल्या आहेत....