अल्पवयीन भाचीवर तिचा चुलत मामा वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना मुंबईच्या घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय मामा विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून तो सध्या फरार आहे.
हेही वाचाः- मी इथंच बसलोय, सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे
पीडित मुलगी आणि तिचा चुलत मामा हे शेजारी शेजारीच राहतात. पीडित मुलीच्या घरची परिस्थिती हालाकिची असल्यामुळे मुलीचे आई-वडिल हे दोघेही कामाला जातात. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने १६ वर्षाच्या पीडित मुलीला धमकावून तिच्यावर मागील अनेक दिवसांपासून अत्याचार करत होता. यातून पीडित मुलगी ही ५ महिन्याची गरोदर राहिली. हीबाब घरातल्यांना कळाल्यानंतर त्यांनी मुलीकडे विचारपूस केली. त्यावेळी तिने मामाने केलेल्या अत्याचाराचा पाडा वाचला. आरोपी मामा दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना येऊन भाचीवर जबरदस्तीने अत्याचार करत होता. वारंवार त्याने हे कृत्य केले. याबाबत कुणाला सांगितस जिवे मारण्याची धमकी द्यायचा. घाबरलेल्या भाचीने याबद्दल कोणालाही सांगितले नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार घाटकोपर पोलिस ठाण्यात मामा विरोधात ३७६ (२), (एफ),आय.एन, ५०६, भा.द.वी ६,१०,१२ पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर आरोपी मामा पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.