टॅक्सीचालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुण जखमी


टॅक्सीचालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुण जखमी
SHARES

वडाळा - शीव कोळीवाड्यातून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका भरधाव ओला टॅक्सीने एका तरुणाला धडक दिल्याची घटना वडाळा येथे रविवारी घडली. या घटनेत स्वप्नील मस्के (17) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वाहनचालक संजय राजू वाल्मिकी याला अटक केली असून, त्याची ओला टॅक्सी ताब्यात घेतल्याचं वडाळा टीटी पोलिसांनी सांगितले.

स्वप्नील आपल्या आईसोबत रस्त्याच्या कडेला जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ओला टॅक्सीने धडक दिल्यानंतर स्वप्नीलच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तो जमिनीवर कोसळला. तेव्हा सैरभैर झालेल्या आईने पादचाऱ्यांच्या मदतीने स्वप्नीलला उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहनासह चालकास ताब्यात घेतले. याप्रकरणी टॅक्सीचालकावर बेदरकारपणे वाहन चालवीत अपघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा