मुंबई - शैक्षणिक संस्थापासून 100 मीटर अंतरापर्यंत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांच्या समाजसेवी शाखेनं धडक कारवाई मोहीम सुरु केलीय. आतापर्यंत 64 दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केलीय. समाजसेवा शाखा आणि जापू शाखेनं दक्षिण मुंबईतील एम. आर. ए. मार्ग, आझाद मैदान, वरळी, ना. म. जोशी मार्ग, ताडदेव, गावदेवी, पायधुनी, जे. जे. मार्ग, डोंगरी, भायखळा परिसरातील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केलीय. तसंच विक्री थांबवली नाही तर ही मोहीम अशी सुरु राहील असं समाजसेवा शाखेकडून सांगण्यात आलंय.