कॉलेज विद्यार्थ्यांचा अपघातात दुर्देवी अंत


कॉलेज विद्यार्थ्यांचा अपघातात दुर्देवी अंत
SHARES

वांद्रे - रिझवी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कॉलेजमधून घराच्या दिशेने मीरारोडकडे जात असताना या दोघांचा अपघात झाला. दुर्देवाने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. सध्या या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बिलाल जलील हुसेन अन्सारी (२०) आणि तीरनडाज सलीम साद अशी या दोघांची नावे आहेत.

सांगितलं जातंय कि सोमवारी संध्याकाळी घरी जात असताना कांदिवली आणि बोरिवली दरम्यान त्यांना एका अनोळखी गाडीने उडवलं. बिलाल अन्सारीचा जागीच मृत्यू झाला. तर, तीरनडाज साद हा जखमी अवस्थेत पडला होता, त्याच वेळी तिथून जात असताना समतानगर पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल अनिल शिंदे यांना तीरनडाज साद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. अनिल शिंदे यांनी त्याला तत्काळ हॉस्पिटलला नेले जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हे दोघेही रिझवी कॉलेजचे विद्यार्थी असून अन्सारी हा हॉटेल मॅनेजमेंटचा होता. तर तीरनडाज सलीम साद हा इंजिनिअरिंगला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा