असा खेळला जातो क्रिकेट सामन्यांवर सट्टा!


असा खेळला जातो क्रिकेट सामन्यांवर सट्टा!
SHARES

आजचा फेव्हरिट कोन, खायचा भाव काय, किती पैसा खेळ आहे, लावायचा भाव काय, ऐकायला हे शब्द काहीसे गंमतीशीर वाटतील. पण या शब्दांवर कोट्यवधींचा व्यवहार चालतो. हा व्यवहार दुसरा तिसरा कुठे नसतो तर क्रिकेट सामन्यांवर लावण्यात येणाऱ्या सट्टेबाजांकडून असतो. २०१८च्या आयपीएलमध्येही अब्जवधी रुपयांचा सट्टा खेळण्यात आल्याचे उघडकीस अालं अाहे.


सट्टेबाजांच्या मुसक्या अावळल्या

अायपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणी ठाणे पोलिसांनी सट्टेबाजांच्या मुसक्या अावळण्यास सुरुवात केली अाहे. दोन दिवसांपूर्वी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकानं अायपीएल सट्टेबाजीप्रकरणी सहाव्या अारोपीला अटक केली अाहे. अांतरराष्ट्रीय कुख्यात बुकी सोनू जलान उर्फ सोनू बाटला (वय ४१, मालाड) या सहाव्या अारोपीला पोलिसांनी पकडलं. सोनूच्या चौकशीतून अभिनेता अरबाझ खानसह अनेक बाॅलिवुड तारकांची नावे पुढे आली. विशेष म्हणजे, या सट्टेबाजीत पैसे लावणाऱ्या नवोदित काॅलेज कुमारांची संख्याही सर्वाधिक आहे.



असा खेळला जातो सट्टा

या सट्टेबाजीचा व्यवहार सांकेतिक भाषेत केला जातो. त्यामध्ये सट्टेबाजाला 'लाईन' असं संबोधलं जातं. सट्टा खेळण्यासाठी काही एजंट नेमलेले असतात. ते एंजट मेन बुकीपर्यंत सट्टा खेळणाऱ्यांचे नंबर देतात. त्यानंतर बुकी लाइनपर्यंत ते नंबर पोहचवतात. एंजटला आगाऊ रक्कम देऊन खातं उघडावं लागतं. त्यांना काही मर्यादाही असतात. हे सट्टेबाज २० ओव्हरला 'लंबी पारी’, दहा ओव्हरसाठी 'सेशन' आणि सुरुवातीच्या चार आणि शेवटच्या सहा ओव्हरला 'छोटी पारी' या तीन टप्प्यात पैसे लावतात.


अशी असते सांकेतिक भाषा

सामन्याच्या सुरुवातीच्या बाॅलपासून सट्टा लावण्यास सुरुवात होते. चढउतार होत असलेल्या भावात सट्टा खेळला जातो. रुपयाला शेकडोचा तर हजारला लाखोंचा सट्टा लावला जातो. म्हणजे ५० रुपये लावल्यास ५०० रुपये मिळतात आणि हजार रुपयांना दहा हजार अशा पद्धतीने पैसे लावले जातात. या सट्टेबाजीत एकदा पैसे लावल्यानंतर त्याला पैसे कमी करायचे असतात. त्यावेळी तो एजंटला 'खाने का भाव क्या है' हे विचारतो. त्यानंतर पुढे नवीन दर लावतो. या सट्टेबाजीत हरणाऱ्या टीमवर अचूक पैसे लावणाऱ्यास सर्वाधिक फायदा होतो.

सट्टेबाजांनी हा सट्टा खेळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे बनवली असून त्याद्वारे सट्टा खेळला जातो. त्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, व्हाॅइस रेकाॅर्डरचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, सट्टेबाज आणि एजंट प्रत्येक मॅचला नवीन फोन वापरतात.


हेही वाचा -

होय, मी बेटिंग केलं - अरबाझ खानची कबुली

अायपीएल सट्टेबाजीप्रकरणी अभिनेता अरबाझ खानला समन्स

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा