आमदारांवरचा रोष पीडितेने खासगी गाड्यांवर काढला


आमदारांवरचा रोष पीडितेने खासगी गाड्यांवर काढला
SHARES

दादरच्या महाराष्ट्र स्कूल परिसरात एका पीडित महिलेने अचानक रस्त्यावर पार्क असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. एका आमदाराने मदतीचे आश्वासन देऊन आपली फसवणूक केल्याच्या रागातून हे पाऊल उचलल्याचं तिने सांगितलं. याप्रकरणी दादर पोलिस ठाण्यात महिलेविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

IMG-20181014-WA0020.jpg

संपूर्ण प्रकार

मूळची चंद्रपूरची राहणारी महिला अनिता ठाकूर ही औरंगाबादच्या एका आमदाराकडे मदतीसाठी गेली होती. त्यावेळी त्या आमदाराने टोलवाटोलवी करून अनिताला मुंबईला येऊन भेटण्यास सांगितले. त्यानुसार लांबचा प्रवास करून अनिता मुंबईला आली. मात्र त्या आमदाराने तिची भेट नाकारत काम करण्यास नकार दिला. याचाच राग अनावर झाल्याने शासकिय गाड्या समजून अनिताने रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांच्या काचांवर पेव्हर ब्लाॅकने हल्ला चढवला. एका मागोमाग एक अनिताने पाच ते सहा गाड्यांची तोडफोड केली आहे.

IMG-20181014-WA0019.jpg

महिलेविरोधात गुन्हा दाखल

भररस्त्यात अनिता एकामागोमाग एक गाड्या फोडत असल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. त्यावेळी गाड्यांच्या मालकाने जाब विचारत अनिताला थांबवलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. त्यावेळी तिने आपल्याला औरंगाबादच्या एका आमदाराने मुंबईला बोलवून मदत करण्याचं आश्वासन देऊन देखील मदत न केल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं सांगितलं. याप्रकरणी दादर पोलिसांनी अनिताला ताब्यात घेत तिच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

IMG-20181014-WA0013.jpg

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा