केवळ पेट्रोल पंपाजवळ शौचाला बसल्यावरुन एका तरुणाला पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी बेदम चोप दिल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडलाय. पनवेल-गोवा हायवेला लागून असलेल्या पंपाजवळ हा प्रकार घडला. पनवेलपासून १५ किलोमीटर अंतरावर हा पेट्रोल पंप आहे. या सगळ्या प्रकाराचा एका प्रत्यक्षदर्शीने काढलेला व्हिडिओ 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागला आहे.
यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी महेंद्र विश्वकर्मा याने सांगितले की, गुरुवारी रात्री ते गोव्याला जात असताना पेट्रोल पंपाजवळच एक तरुण शौच करत होता. ते पाहून पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला लाथा, बुक्क्यांनी आणि बांबूने मारायला सुरुवात केली. शेवटी आसपासच्या जमावाने मध्यस्थी केल्यानंतर या तरुणाची सुटका झाली.