Advertisement

मुंबई विद्यापीठात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा- डाॅ. मुणगेकर


मुंबई विद्यापीठात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा- डाॅ. मुणगेकर
SHARES

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या भोंगळवाण्या कारभारावर जोरदार टीका करत संजय देशमुख यांची हकालपट्टी करण्यास एवढा उशीरा का? असा प्रश्न उपस्थित केला. 

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी कुलगुरू संजय देशमुख यांची हकालपट्टी केली. पण केवळ हकालपट्टी करून उपयोग नाही तर विद्यापीठाची बिघडलेली यंत्रणा सुधारणं गरजेचं आहे, असं मत मांडत डाॅ. मुणगेकरांनी ज्या कंपनीमुळे हा घोळ झाला त्या कंपनीला पुन्हा तीन वर्षांकरीता कंत्राट कशासाठी? विद्यापीठातील प्रभारी पदे केव्हा भरणार? असे अनेक प्रश्नही पत्रकार परिषद घेऊन सरकारला विचारले. 


विद्यापीठाने हमी द्यावी 

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या तर विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा नुकसान होईल. पुन्हा ऑनलाईन पद्धतीने हे निकाल लागणार असतील, तर विद्यापीठाने ४५ दिवसांत निकाल जाहीर करू, अशी हमी न्यायालयात द्यावी, असं मुणगेकर म्हणाले.


मोठा आर्थिक घोटाळा

निलंबित कुलगुरू संजय देशमुख यांनी ऑनलाईन असेसमेंटसाठी 'मेरीट ट्रॅक' कंपनीला कंत्राट देताना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला आहे. त्यामुळे या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.  


राज्यपालांवर कुणाचा दबाव?

डाॅ. संजय देशमुख यांची हकालपट्टी एवढ्या उशीरा का? या आधीच त्यांची हकालपट्टी झाली असती तर एव्हाना नवीन कुलगुरू विद्यापीठाला मिळाले असते. राज्यपालांवर असा कोणता दबाव होता की त्यांनी हा निर्णय घ्यायला उशीर लावला? दरम्यान आॅनलाइन असेसमेंटचा निर्णय घेतल्याप्रकरणी विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठरावही केला. त्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणीही डाॅ. मुणगेकर यांनी केली.  


एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या  

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे मुंबई विद्यापीठाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना एकाच वेळी दोन्ही जबाबदाऱ्या पेलाव्या लागत आहे. यामुळे दोन्ही विद्यापीठाचं नुकसान होत आहे. कुलगुरू हकालपट्टीचा निर्णय वेळेत न घेतल्याचा परिणाम दोन्ही विद्यापीठाला भोगावा लागत आहे.


कायमस्वरूपी जागा भराव्या 

कुलगुरूंप्रमाणेच विद्यापीठात अनेक जागांवर सध्या प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुलगुरू, रजिस्ट्रार, परीक्षा संचालक अशी अनेक महत्त्वाची पदे अद्याप रिक्त आहेत. त्या जागी प्रभारी नेमण्यात आले आहेत. अशा जागा लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी मुणगेकरांनी यावेळी केली.



हेही वाचा-

सरासरी गुण कोणत्या आधारावर? - माजी कुलगुरू

31 जुलै ही मुदत कोणत्या आधारावर दिली? - मुणगेकर


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा