महापालिकेच्या शाळांमध्ये (BMC School) घडलेल्या काही घटनांमुळं विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा (Students Safety) प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचे तीव्र पडसाद शिक्षण समितीच्या (Education Committee) बैठकीत मंगळवारी उमटले असून, अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी महापालिकेच्या ५२० शाळा इमारतींचे (School Building) प्रवेशद्वार (Entry) व बाहेर (Exit) पडण्याच्या मार्गावर आणि इयत्ता चौथी ते सातवीच्या वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसविण्याचे आश्वासन प्रशासनानं दिलं आहे. याबाबत लवकरच निविदा प्रक्रियाही (Tender process) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महापालिकेच्या
५२० शाळा इमारतींच्या
प्रवेश-बाह्यगमन
तसेच चौथी ते सातवीच्या
वर्गांमध्ये आता सीसीटीव्ही
कॅमेरे लावण्यास
महापालिका
आयुक्तांनी यास मंजुरी दिली.
मंगळवारी
झालेल्या शिक्षण समितीच्या
बैठकीत शिवसेना नगरसेविका
शुभदा गुढेकर यांनी (Shiv
Sena corporator Shubhada Gudhekar)
'वीर
भगतसिंग इंटरनॅशनल स्कूल'(Veer
Bhagat Singh International School)
विरोधात
मालवणी पोलिस ठाण्यात (Malwani
Police Station)
पोक्सो
कायद्यांतर्गत (Poxo act)
गुन्हा
दाखल होऊनही महापालिकेनं
संबंधित शाळा व्यवस्थापनावर
अद्याप कोणतीही कारवाई केली
नसल्याकडं लक्ष वेधलं.
याबाबत
महापालिका प्रशासनाकडं वारंवार
पाठपुरावा करूनही दुर्लक्ष
केल्याबद्दल त्यांनी संताप
व्यक्त केला.
'महापालिका
या शाळांना मान्यता देत
असल्यामुळं विद्यार्थिनींच्या
सुरक्षेबाबत (Students
Safety)
काळजी
घ्यायला हवी,
आवश्यक
सर्व प्रकरणांत तातडीनं कारवाई
करायला हवी',
असं
त्यांनी म्हटलं.
या
घटनांच्या पार्श्वभूमीवर
सर्वपक्षीय सदस्यांनी (All-party
member)
महापालिका
प्रशासनाला धारेवर धरत,
विद्यार्थ्यांच्या
सुरक्षेसाठी काय उपाययोजना
करणार याचे स्पष्टीकरण देण्याची
मागणी केली.
त्यावेळी
शिक्षण समिती सदस्य साईनाथ
दुर्गे (Education
Committee Member Sainath Durg)
यांनी
शाळांमध्ये सीसीटीव्ही
लावण्याच्या योजनेची माहिती
देण्याची मागणी केली.
पर्यावरणमंत्री
आदित्य ठाकरे (Environment
Minister Aaditya Thackeray)
यांच्या
संकल्पनेतून महापालिका
शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही
कॅमेरे बसवण्याची मागणी
करण्यात आल्याचं निदर्शनास
आणून दिले.
महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका दिरंगाई का करते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी प्रशासनाला तातडीनं उत्तर देण्याचे निर्देश दिले. यावर, पालिका शाळांमध्ये लवकरच सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलिल यांनी दिली.
पालिकेच्या
सुमारे ९८१ शाळांमध्ये २ लाख
७१ हजार विद्यार्थी शिक्षण
घेत आहेत.
पालिकेच्या
स्वतःच्या ४५८ इमारती असून,
६२
खासगी इमारतींत हे वर्ग सुरू
आहेत.
यामध्ये
पहिल्या टप्प्यात सुमारे १
हजार सीसीटीव्ही लावण्यात
येणार आहेत.
सर्व
शाळांच्या प्रवेश आणि बाहेर
जाण्याच्या मार्गावर आणि
चौथी ते सातवीच्या वर्गांत
हे सीसीटीव्ही लावण्यात येणार
असल्याची माहिती समोर येत
आहे.
हेही वाचा -
Kala Ghoda Festival 2020 : खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यास न्यायालयाची मनाई
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाजणार 'वॉटर बेल'