माध्यमिक (10वी SSC) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी HSC) जुलै-ऑगस्ट 2024 परीक्षांसाठी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध होतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी ही माहिती दिली.
तसेच हॉल तिकीट (Hall Ticket) मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा/कॉलेजशी संपर्क साधावा. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना हॉल तिकीट(Hall Ticket) ऑनलाइन संकेतस्थळांवरून डाउनलोड करून मिळेल. तसेच या हॉल तिकीटवर शाळा आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य अधिकृत शिक्का लावतील आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
हॉल तिकिटात (Hall Ticket) विद्यार्थ्यांचे विषय किंवा माध्यमात बदल,फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भात काही दुरुस्त्या असल्यास विद्यार्थ्यांनी ताबडतोब शाळा अथवा महाविद्यालयाला कळवावे.
हॉल तिकिट (Hall Ticket) हरवल्यास शाळा अथवा महाविद्यालय हॉल तिकिट (Hall Ticket) करून पुन्हा प्रिंट करून त्यावर दुय्यम प्रत (डुप्लिकेट) असा उल्लेख करून संबंधित विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव शैलेंद्र पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा