Advertisement

कल्याण उपकेंद्रात इंजिनिअरिंग अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात २०१९-२० या नव्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. विद्वत परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली.

कल्याण उपकेंद्रात इंजिनिअरिंग अभ्यासक्रम
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात २०१९-२० या नव्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. या अंतर्गत एम.टेक कम्प्युटर इंजिनीअरिंग, एम.टेक. केमिकल इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी, एम.टेक. ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग, एम.टेक. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एमएस्सी इन ओशनोग्राफी हे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसंच पीएचडी संशोधन केंद्र देखील सुरू करण्यात येईल. विद्वत परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली.


 नवी ओळख

कम्प्युटर आर्किटेक्चर, कम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अल्गोरिदम आणि डेटा व्यवस्थापन तंत्रांचं एकत्रीकरण, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्लाऊड कम्प्युटिंग, मशिन लर्निंग, बिग डेटा, इमेज प्रोसेसिंग, अॅडव्हांस ऑपरेटिंग सिस्टीम्स, एम्बडेड सिस्टम डिझाइन अशा अद्ययावत अभ्यासक्रमाचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून विद्यापीठाने या अभ्यासक्रमांना सुरूवात केली आहे. राज्याला अरबी समुद्राचा ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला असल्याने समुद्री क्षेत्रात रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने एमएस्सी ओशनोग्राफी हा अभ्यासक्रमही सुरू केला आहे. एवढंच नाही, कल्याण उपकेंद्र हे मुंबई विद्यापीठाचं स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस म्हणून ओळखलं जाईल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. 


 प्रशिक्षित मनुष्यबळ

मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्यात मुंबई विद्यापीठाला यश येईल, अशी अपेक्षा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी व्यक्त केली.



हेही वाचा-

वैद्यकीय प्रवेश: राज्य सरकार भरणार मराठा विद्यार्थ्यांची फी

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा