Advertisement

विद्यार्थ्यांना खूशखबर, डेटा सायन्समध्ये करता येईल स्पेशलायझेशन!

डेटा सायन्सच्या पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवीधर विद्यार्थी प्रवेश परीक्षा देऊ शकतो. ही प्रवेश परीक्षा लवकरच होणार असून यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै असणार आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार असून विद्यार्थ्याने त्याच्या सवडीने अभ्यासक्रम व परीक्षा देत एक एक टप्पा पूर्ण करायचा आहे.

विद्यार्थ्यांना खूशखबर, डेटा सायन्समध्ये करता येईल स्पेशलायझेशन!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कम्प्युटर सायन्स विभागानं काळाची गरज ओळखून एम.एससी. करताना 'डेटा सायन्स' मध्ये स्पेशलायझेशन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यापीठात मंगळवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी 'ब्लेंडेड मूक'चा वापर करण्यात येणार असून अशाप्रकारे शिक्षण देणारा हा देशातील पहिला अभ्यासक्रम असणार आहे.


काय आहे 'डेटा सायन्स'?

माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे संपूर्ण जग एका क्लिकवर आलं आहे. त्यामुळे ‘डेटा’ (माहिती) ला महत्त्व प्राप्त झालं आहे. बाजारपेठेतील उत्पादनामधील स्पर्धा असो किंवा निवडणुकीचा कल 'डेटा' संकलनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे जगभरात डेटा सायंटिस्टची मागणी वाढत आहे. डेटा सायंटिस्ट माहिती गोळा करणं आणि तिचं विश्लेषण करण्याचं काम करतात. त्यासाठी डेटा प्रॉडक्ट, ऑटोमेटेड डेटा अ‍ॅनालिसिस टूल, डायनॅमिक व्हिज्युअलायजेशन आदीचा वापर करतात.


कुणाला घेताा येईल प्रवेश?

डेटा सायन्सच्या पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवीधर विद्यार्थी प्रवेश परीक्षा देऊ शकतो. ही प्रवेश परीक्षा लवकरच होणार असून यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै असणार आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार असून विद्यार्थ्याने त्याच्या सवडीने अभ्यासक्रम व परीक्षा देत एक एक टप्पा पूर्ण करायचा आहे.

Advertisement


'या' संकेतस्थळावर जाईल

यात विद्यार्थ्याने पदवी मिळवल्यानंतरच त्याला अंतिम परीक्षा देऊन त्याला पदव्युत्तर पदवीचं प्रशिक्षण घेता येईल. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यास या प्रोग्राममधील मॉड्युलसना प्रवेश घेऊन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अर्धे क्रेडिट्स जमवता येतील. राहिलेले क्रेडिट पदवीनंतर पूर्ण करून पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येईल. यासाठी विद्यार्थांनी प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी htpp://udcs.mu.ac.in/ व  htpp://www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.


'ब्लेंडेड मूक' तंत्रज्ञानाचा वापर

विद्यार्थ्यांना त्यांच्या सवडीनुसार विद्यापीठातून अत्यंत कमी खर्चात कम्प्युटर सायन्स विषयातून एम.एससी. करता यावं या हेतूने हे मॉडेल डिझाइन केलं आहे. दररोज अपलोड केलेल्या व्हिडिओनुसार विद्यार्थी कुठूनही अभ्यास करू शकतील. आठवड्यातून २ दिवस विद्यार्थ्याने त्याला नेमून दिलेल्या अभ्यासकेंद्रात प्रत्यक्ष हजर राहणं बंधनकारक असेल.

Advertisement

आयआयटी मुंबईने तयार केलेल्या 'ब्लेंडेड मूक' तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात येणार आहे. डेटा सायन्सच्या प्रोग्राममध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पुढील अभ्यासक्रमाच्या शुल्कात १० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.



हेही वाचा-

विनापरमिट स्कूल व्हॅनवर कारवाई करा-हायकोर्ट

पावसामुळे परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा