मुंबईतील विद्यापीठांतर्गत (Mumbai University) येणारे सर्व कॉलेजेसमध्ये मराठीमध्ये नाम (Marathi Name bored) फलक असतील अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठानं मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी विशेष परिपत्रक काढलं आहे.
मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय अशासकीय अशा सर्व प्रकारच्या पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयाचे नाम फलक मराठीत असावेत, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
आता या सूचनांचे पालन मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ८०० पेक्षा अधिक महाविद्यालयांना करायचे आहे.
मागील महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत मराठी भाषेला अनुसरून मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मराठीला अधिकाधिक स्थान मिळावं, अधिकाधिक मराठी भाषेचा वापर व्हावा. यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे, अशा प्रकारचा स्थगन प्रस्ताव युवासेनेच्या वतीनं मांडला होता.
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्णय तातडीनं घ्यावा, म्हणून निवेदन सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलं होतं. त्यानंतर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद विद्यापीठानं दिला आहे. त्या संदर्भातील सूचना तातडीनं विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
विद्यालयाच्या सूचनेत नमूद केलं आहे की, सहज दिसेल अशा पद्धतीनं महाविद्यालयाचे नाव दर्शनी भागात मराठीत असावे. महाविद्यालयाची माहिती पुस्तक, प्रवेश अर्ज मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावेत. यासोबतच महाविद्यालयांच्या पत्रव्यवहारात प्राधान्याने मराठीचा वापर करण्यात यावा. महाविद्यालयांमध्ये सूचना मराठीतून लिहिण्याला प्राधान्य द्यावे.
हेही वाचा