इयत्ता तिसरीतील मुले जी इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे. इयत्ता तिसरीमध्ये गणितीय क्रियांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र हा देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. 2022 च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये यात 13 टक्क्यांची वाढ दिसून येते.
इयत्ता पाचवीच्या मुलांमध्ये सन 2022 च्या तुलनेमध्ये सन 2024 मध्ये वाचनामध्ये 2.2 टक्के अधिकची प्रगती झाल्याचे दिसून येते. सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे.
वय वर्ष 14 ते 16 मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल (digital) साधनांची उपलब्धतामध्ये राज्यातील 94.2 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे व यातील 84.1 टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात.
यामधील 19.2 टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्मार्टफोन असल्याचे नमूद केले आहे. यातील 63.3 टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतात, तर विविध सामाजिक माध्यमांसाठी 72.7 टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा वापर करतात.
पटनोंदणी दर 99 टक्क्यांपेक्षा जास्त सन 2024 मध्ये तीन वर्षांच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असणाऱ्या मुलांचे प्रमाण 95 टक्के आहे. 2022 मध्ये हे प्रमाण 93.9 टक्के होते.
महाराष्ट्रात 6 ते 14 वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या 8 वर्षांपासून 99 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महामारीच्या काळात शाळा बंद असूनही 2018 मधील 99.2 टक्क्यांवरून एकूण पटनोंदणीचे आकडे 2022 मध्ये 99.6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
या वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण 0.4 टक्के आहे जे की देशभरात 1.9 टक्के आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
हेही वाचा