Advertisement

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार, क्युआर कोडचा होणार वापर

विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकात क्वीक रिस्पॉन्स (क्यूआर) कोडचा वापर करण्याची कल्पना एनसीईआरटीच्या कार्यकारिणीतील सदस्या माधुरी शहाणे यांनी कार्यकारिणीच्या सभेत मांडली होती.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार, क्युआर कोडचा होणार वापर
SHARES

२०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणारं दप्तराचं ओझ कमी करण्यासाठी शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये क्विक रिस्पॉन्स कोड (क्युआर कोड) चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (एनसीईआरटी) च्या सभेत याबाबतची माहिती देण्यात आली.


कार्यगट स्थापन 

विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकात क्वीक रिस्पॉन्स (क्यूआर) कोडचा वापर करण्याची कल्पना एनसीईआरटीच्या कार्यकारिणीतील सदस्या माधुरी शहाणे यांनी कार्यकारिणीच्या सभेत मांडली होती. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांना या कल्पनेवर विचार करण्यासाठी कार्यगट स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.


लॅपटॉप, डिजीटल बोर्डवर अभ्यास 

या कल्पनेद्वारे पहिली ते बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकांना दृकश्राव्य आशयाशी जोडून स्वाध्याय, सराव चाचण्या इत्यादींचं पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी ई-सामग्री तयार करुन ती क्यूआर कोडशी जोडण्यात येणार आहे. ती सर्व ई-सामग्री चौकोनातील काळ्या आणि पांढऱ्या रंगातील विशेष प्रकारच्या क्यूआर कोडमध्ये साठवलेल्या वेबलिंक किंवा अन्य सूचना स्मार्ट फोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने वाचता येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील धड्यांशी संबंधित माहिती लॅपटॉप किंवा डिजीटल बोर्डवर अभ्यास करण्यास हातभार लागणार आहे. अशी माहिती शहाणे यांनी कार्यगटात सहभागी होताना केली.


पुढील वर्षापासून अंमलबजावणी 

क्यूआर कोडच्या सहाय्याने पाठपुस्तकातील धड्याशी संबंधीत ई-सामुग्री, नकाशे, व्हिडिओ, अॅनिमेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन यासारखी अभ्यासाची उपयुक्त आणि अतिरिक्त सामुग्री उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार पुढच्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन व लॅपटॉपद्वारे अभ्यास करणं सोप जाणार आहे.



हेही वाचा -

विद्यार्थ्यांनो, ३० तारखेपासून भरा १७ नंबरचा फॉर्म

मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयाची संख्या वाढणार



 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा