मुंबई - राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या पगारासाठी असलेली तरतूद संपल्याने जानेवारी आणि फेब्रुवारीचे पगार अडचणीत आले होते. आमदार कपिल पाटील यांनी थेट शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्याकडे खटपट केल्यानंतर तरतुदीची शिल्लक 20 टक्के रक्कम म्हणजेच 2 हजार 323 कोटी रुपये गुरुवारी रिलीज करण्यात आले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यातील शिक्षकांचे पगार होऊ शकतील.
मुंबईचे पगार युनियन बँकेमार्फत नियमित 1 तारखेला होतात. मात्र, 1 तारीख उजाडेपर्यंत ट्रेझरीकडून ईसीएसच झाले नव्हते. कारण पगारासाठी असलेली 80 टक्के रक्कम संपली होती. वर्षभराच्या पगारासाठी 13 हजार कोटी रुपये आवश्यक असतात. त्यापैकी उर्वरित 2 हजार 323 कोटी रुपये अदा करण्यात आले. मुंबईतील काही भागात शिक्षकांचे पगार गुरुवारी झाले. तर उर्वरित पगार शनिवार किंवा रविवारपर्यंत होतील, असं राज्याचे शिक्षण संचालक एन. के. जरग यांनी कपिल पाटील यांना सांगितलं.