Advertisement

सुरक्षित प्रवासासाठी शालेय विद्यार्थ्यांना धडे


सुरक्षित प्रवासासाठी शालेय विद्यार्थ्यांना धडे
SHARES

वडाळा - वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या वतीनं सुरक्षित प्रवासाबाबत शाळेतील विद्यार्थ्यांना धडे देण्यात येतायेत. माटुंगा पूर्व इथल्या लायन्स पयोनियेर मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांना, तर वडाळा पूर्व बीपीटी कॉलनी इथल्या एस.एस.रेनॉल्डस उर्दू माध्यम विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास कसा करावा याचे धडे देण्यात आले. लोहमार्ग वडाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तसंच प्रवासाबाबत जागृत करणारी पत्रकंही वाटण्यात आली. या वेळी मुख्याध्यापिका राजिया शेख, शिक्षक, पोलीस उप निरीक्षक अनिल बर्वे आदी पोलीस कर्मचारी आणि रेल्वे प्रवासी मित्र उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा