Advertisement

मिठीबाई कॉलेजमध्ये चेंगराचेंगरी, ८ विद्यार्थी जखमी


मिठीबाई कॉलेजमध्ये चेंगराचेंगरी, ८ विद्यार्थी जखमी
SHARES

विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेजमध्ये 'कॉलॉझम फेस्टिव्हल'दरम्यान गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चेंगराचेंगरी होऊन ८ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यातील तिघांना अतिदक्षता (ICU) विभागात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली याच अद्याप कारण समजू शकल नाही.


गर्दीत भर

गेल्या अनेक वर्षांपासून मिठीबाई कॉलेजमध्ये कॉलॉझम फेस्टिव्हल आयोजित करण्यात येतो. या वर्षीही हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला असून यांत इतर कॉलेजांतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. त्यामुळे कॉलेज कॅम्पसमध्ये चांगलीच गर्दी झाली होती. याच गर्दीमुळे अचानक त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीमुळे अनेक विद्यर्थ्यांच्या छातीत दुखायला लागल्यानं त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


उपचार सुरु

कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठीबाई कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये जखमी झालेल्या ८ विद्यार्थ्यामध्ये २ मुली आणि ६ मुलांचा समावेश आहे. या सर्वाना छातीत कळ आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून यातील ३ विद्यार्थ्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर इतर ५ जणांना उपचार देऊन घरी सोडण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या कॉलेजमधील वातावरण नियंत्रणात आलं असून इतर विद्यार्थ्यांनी घरी जाण्यास सांगितलं आहे.



हेही वाचा-

कामगार रुग्णालय आग: मृतांची संख्या ११ वर

यूट्यूब स्टार दानिश झहेनचा कार अपघातात मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा