Advertisement

ठाण्यातील दोन गावांनी विद्यार्थ्यांसाठी केली मोफत वायफायची सोय

ठाणे जिल्ह्यातील दोन गावांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत वायफायची व्यवस्था केली आहे.

ठाण्यातील दोन गावांनी विद्यार्थ्यांसाठी केली मोफत वायफायची सोय
SHARES

ठाणे जिल्ह्यातील दोन गावांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत वायफायची व्यवस्था केली आहे. जेणेकरून लॉकडाऊन दरम्यान वायफायमुळे त्यांचे ऑनलाइन वर्ग चुकू नयेत.

लॉकडाऊनमध्ये सध्या ऑनलाऊन शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. पण ग्रामीण भागात वायफायची सुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. अशा परिस्थितीत ठाण्यातील या गावांनी चांगंल उदाहरणच ठेवंल आहे.  

हिंदुस्तान टाईम्सच्या म्हणण्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील वेहलोंडे आणि डालखन या गावात सामान्य राऊटर बसवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्यानं वायफाय वापरण कठिण होऊन जातं. अशावेळी उचलेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

कल्याणपासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या डालखान गावात वायफाय राउटरची व्यवस्था अनेक भागात केली गेली आहे. याचा फायद विद्यार्थ्यांना होत आहे. यामुळे विद्यार्थी घरातून शिकू शकतील आणि कोरोनाच्या काळात सामाजिक अंतर राखू शकतील.

यापूर्वी ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. पण सध्या ठाण्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, जुलै महिन्यात ठाण्यात दररोज सरासरी ३५२ रुग्णांची नोंद होत होती. परंतु ऑगस्टमध्ये ही संख्या २०० पर्यंत कमी झाली आहे.

सप्टेंबरमध्ये यात वाढ झाली असून दररोज सरासरी ३६२ प्रकरणं नोंदवली गेली. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्णांच्या घटनेत TMC नं घट नोंदवली आहे. सध्या, दररोज १००-१२० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत.



हेही वाचा

दिवाळीनंतर शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

११वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, सोमवारपासून ऑनलाइन वर्गाला सुरुवात

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा