Advertisement

आता एक क्लिकवर भेटणार विजय पाटकर

हिंदी तसंच मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर कामगिरी बजावणारे पाटकर, किनशीप हब या अॅपद्वारे आपल्या चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

आता एक क्लिकवर भेटणार विजय पाटकर
SHARES

सध्याचा जमाना डिजीटलचा आहे. साऱ्या जगाला जिथे डिजीटलने वेड लावलं आहे तिथे चंदेरी दुनियेत चमचमणारे तारे कसे मागे राहतील बरं. ते देखील या विश्वाच्या प्रेमात आहेत. आज जवळजवळ प्रत्येक कलाकार आपल्या भावना डिजीटलच्या माध्यमातून शेअर करताना दिसतो. यात विजय पाटकरसारखा हिंदीत रुळलेला मराठमोळा अभिनेताही मागे नाही. पाटकर आता केवळ एका क्लीकवर आपल्या चाहत्यांना भेटणार आहेत!


 अस्तित्व सिध्द करण्यासाठी

भारतीय चित्रपटसृष्टीची व्याप्ती खूप मोठी असून, या सृष्टीत वावरणाऱ्या कलाकारांच्या कामगिरीमुळे हिंदी तसेच इतर प्रादेशिक चित्रपटांचा बोलबाला दिवसागणीक वाढत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. या प्रसिद्धीत मराठी चित्रपट आणि मराठी कलाकारदेखील मागे राहिलेले नाहीत. कारण, मराठी कलाकारांच्या चाहते वर्गातदेखील प्रचंड वाढ होत आहे. चाहत्यांच्या या गराड्यात टिकून राहण्यासाठी आणि आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी कलाकार मंडळी सतत प्रयत्नशील असतात. असाच एक प्रयत्न मराठीचे ज्येष्ठ आणि गुणी कलाकार विजय पाटकर यांनी केला आहे. 


अॅपचं अनावरण 

हिंदी तसंच मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर कामगिरी बजावणारे पाटकर, किनशीप हब या अॅपद्वारे आपल्या चाहत्यांच्या भेटीस येत आहेत. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची इत्यंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या या अॅपमुळे, पाटकर यांना प्रेक्षकांसोबत जवळीकदेखील साधता येणार आहे. एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध करून देणाऱ्या या अॅपचं नुकतंच एका छोटेखानी समारंभात अनावरण करण्यात आलं.


किनशिप हब

किनशिप हब या अॅपद्वारे पाटकरांसोबत थेट संवाद साधण्याची संधीदेखील प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, हे अॅप पाटकर यांच्या अॅडमीन नियंत्रणाखाली प्रसारित होत असल्याकारणामुळे, यात ट्रोलर्सना जागा नाही. थोडक्यात काय तर, या अॅपचा आस्वाद पाटकर यांच्या खऱ्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना घेता येणार आहे.



हेही वाचा-

समीर धर्माधिकारी साकारणार डॉन

'विठ्ठल' मध्ये अवतरला श्रेयस तळपदे ?




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा