Advertisement

लग्नाची खोटी बातमी ऐकून विरुष्कालाही फुटले असेल हसू


लग्नाची खोटी बातमी ऐकून विरुष्कालाही फुटले असेल हसू
SHARES

सागरिका घाटगे आणि जहीर खान यांच्या लग्नानंतर आता भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. काही तासांपूर्वी विराट आणि अनुष्का लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. इटलीतल्या मिलान इथं  ९, १०,११,१२ या तारखेला त्यांचा शुभविवाह होणार आहे, अशी बातमी सर्वत्र पसरली. पण विराट-अनुष्काच्या लग्नाची बातमी अफवा असून दोघं लग्नबंधनात अडकणार नसल्याची बातमी अनुष्का शर्माच्या प्रवक्त्यानं पीटीआयला दिली.


रविंद्र जडेजानं देखील या बातमीचं खंडन केलं आहे. यासंदर्भात रविंद्र जडेजानं ट्वीट करत म्हटलं की, "विराट-अनुष्काची बातमी फक्त अफवा आहे. कुणीही यावर विश्वास ठेवू नका."


याचवर्षी, म्हणजे डिसेंबरमध्ये त्यांचा विवाह पार पडणार आहे. दोघांचं लग्न हे हिंदू पद्धतीनं होणार असल्याचं बोललं जातं होतं. येत्या १० डिसेंबरपासून श्रीलंका-भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र विराटला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. विराटनं बीसीसीआयकडे सुट्टीसाठी अर्ज केला होता. अर्जात विराटनं सुट्टीचं कारण खाजगी असल्याचं म्हटलं होतं. फक्त एवढंच नाही तर अनुष्कानं डिसेंबरमध्ये शूटिंग करणार नसल्याचं निर्माता-दिग्दर्शकांना आधीच बजावलं होतं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या


पण विराट कोहलीच्या सुट्टीच्या मागे लग्न हे कारण नाहीये. भारतीय संघ २८ डिसेंबरला साऊथ आफ्रिकेसाठी रवाना होणार आहे. आफ्रिकेत होणाऱ्या सामन्यांसाठी विरोट कोहलीला आराम देण्यात आला आहे. म्हणून श्रीलंकेविरोधात १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत तो खेळणार नाहीये. यासाठीच त्यानं सुट्टीचा अर्ज केला होता.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा