खरं तर बऱ्याच कलाकारांचा प्रवास रंगभूमी, एकांकीका, शॅार्टफिल्म ते सिनेमा असा होतो, पण काही कलाकार मात्र याला अपवाद ठरतात. थेट मोठ्या पडद्यावर एन्ट्री करत ते नावलौकिक मिळवतात, पण इतर कलाकारांप्रमाणे आपणही ‘तो’ प्रवास अनुभवावा असं त्यांना वाटत असतं. असे कलाकार मग सिनेमाकडून रंगभूमी तसंच शॅार्टफिल्मकडे वळतात.
‘स्वराज्य - एक पाऊल पुढे’, ‘विजय असो’, ‘वंशवेल’, ‘बेधडक’ या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारतानाच ‘ज्ञानोबा माझा’ या नाटकात भगवान विठ्ठलाची पत्नी रुक्मिणीच्या भूमिकेत दिसलेली नम्रता गायकवाडही शॅार्टफिल्मकडे वळली आहे. ‘प्रँक’ या शाॅर्टफिल्ममध्ये अभिनय करण्याचा अनुभव नम्रताने ‘मुंबई लाइव्ह’शी शेअर केला.
सध्या सोशल मीडियावरील माझ्या व्हिडीओजना खूप लाईक्स मिळत आहेत. त्यामुळे ‘बेधडक’ या सिनेमानंतर काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते. अशातच ‘प्रँक’ या शाॅर्टफिल्ममध्ये काम करण्याची आॅफर मिळाली. यापूर्वी मी कधीच शाॅर्टफिल्ममध्ये काम केलं नसल्याने काम करण्याची इच्छा होतीच. शाॅर्टफिल्मचा विषय आणि कॅरेक्टर आवडल्याने होकार दिला.
‘प्रँक’मध्ये माझ्या जोडीला वैभव सातपुतेने मुख्य भूमिका साकारली आहे. वैभवने ‘बेधडक’ सिनेमातील माझं काम पाहिलं होतं. ते त्याला खूप आवडल्याने त्याने ‘प्रँक’चे दिग्दर्शक शौनक शिरोळे यांना माझ्याबाबत सांगितलं. त्यांचीही माझ्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे सर्व गोष्टी अचूकपणे जुळत गेल्या.
आजवर मी कधीही हाॅररपटात काम केलेलं नसल्याने या जाॅनरमधील थ्रील अनुभवायचं होतंच. ‘प्रँक’च्या निमित्ताने ही गोष्ट शक्य झाली. यात मी प्रिया नावाच्या एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. एखादा गंभीर विषय तितक्याफेस्टिव्हलच गांभीर्याने मांडताना कशाप्रकारे स्वत:च्या मनाचाही कसा थरकाप उडतो याचा प्रत्यय ‘प्रँक’च्याफेस्टिव्हलफेस्टिव्हल निमित्ताने आला. यातील वनटेक सीन्स करण्यातही एक वेगळंच थ्रील होतं.
‘प्रँक’च्या माध्यमातून एखाद्याला आश्चर्यचकित करण्याचे प्रकार सर्वांच्याच जीवनात सर्रासपणे घडत असतात. यामागे कोणतीही वाईट भावना नसते, पण त्या ‘प्रँक’चा समोरच्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो याचा विचार कोणीच करत नाही. थट्टा-मस्करीतील गोष्ट एखाद्याने मनाला लावून घेतली, तर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो याची झलक १० मिनिटांच्या या शाॅर्टफिल्ममध्ये पाहायला मिळेल.
खरं तर शाॅर्टफिल्म्सचं प्राॅपर लाँचिंग किंवा प्रमोशन करण्याची पद्धत आपल्याकडे अद्याप रूजलेली नाही. पण ‘प्रँक’ या शॅार्टफिल्मचं लाँचिंग एखाद्या सिनेमाप्रमाणे करण्याची योजना आखण्यात आली आहे. सध्या काही तांत्रिक कामं सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यावर ‘प्रँक’च्या लाँचिंगची घोषणा करण्यात येईल.
देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांसाठी ‘प्रँक’ पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. डबिंग पूर्ण झालं असून, पोस्ट प्रोडक्शन संपल्यावर आधी घोषणा आणि मग फेस्टिव्हल असा ‘प्रँक’चा प्रवास सुरू होईल.
हेही वाचा -
इच्छा मरणावर भाष्य करणारा 'बोगदा'