Advertisement

अभिनेत्री सायरा बानू आयसीयूत दाखल, श्वास घेण्यास होतोय त्रास

अभिनेत्री सायरा बानू (७६) गेल्या तीन दिवसांपासून हिंदूजा रुग्णालयातील आयसीयूत दाखल आहेत.

अभिनेत्री सायरा बानू आयसीयूत दाखल, श्वास घेण्यास होतोय त्रास
SHARES

अभिनेत्री सायरा बानू (७६) गेल्या तीन दिवसांपासून हिंदूजा रुग्णालयातील आयसीयूत दाखल आहेत. त्यांची ऑक्सिजनची पातळी घसरली असून श्वसनाचा त्रास होत आहे.

सध्या सायरा बानूंची तब्येत स्थिर असली तरीही त्यांचा रक्तदाब नियंत्रणात नाही. ऑक्सिजनची पातळी खालावलेली आहे. त्यामुळे, श्वसनाचा त्रास होत आहे. अशात त्यांना आणखी 3 ते 4 दिवस रुग्णालयातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, दिलीप कुमार यांच्या निधनापासूनच त्या जबरदस्त मानसिक धक्क्यात आहेत. त्यांनी स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवलं आहे. त्या कुणाशी बोलत सुद्धा नाहीत.

दिलीप कुमार उर्फ युसूफ खान यांचे ७ जुलै रोजी निधन झाले. सायरांनी आपले पूर्ण आयुष्य दिलीप कुमार यांची देखभाल करण्यासाठी समर्पित केलं होतं. स्वतः ७६ वर्षांच्या असलेल्या सायरा बानू आपल्या वयाची ५४ वर्षे दिलीप कुमार यांच्यासोबत होत्या.

वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी युसूफ यांच्याशी निकाह केला होता. आता युसूफ साहेबांच्या जाण्यानं सायरा बानू यांना कुठल्याही गोष्टीत रस राहिलेला नाही असंच दिसून येत आहे.



हेही वाचा

‘एक नंबर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित...

पिकल म्युझिकचं 'उसासून आलंय मन' रसिकांच्या भेटीला

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा