Advertisement

'सलमान, शिल्पा शेट्टीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा'


'सलमान, शिल्पा शेट्टीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा'
SHARES

वृत्त वाहिनीवरील मुलाखतीत जातीवाचक वक्तव्य करून अवमान केल्याप्रकरणी सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅड. नवनीत भोजने यांनी भोईवाडा कोर्टात दाखल केली आहे.


पोलिसांकडून मिळाला नकार

यापूर्वी भोजने यांनी वरळी पोलिस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दिली होती. मात्र, सलमान आणि शिल्पा शेट्टी विरोधात राजस्थानमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे कारण देत पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यामुळे, न्यायालयात धाव घेतल्याचे भोजने यांनी सांगितले.


टीव्ही चॅनेलवर केली होती टिप्पणी

अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी डिसेंबर महिन्यात एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात एका समाजाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याचे पडसाद देशभर उमटले. या प्रकरणी राजस्थानमध्ये दोघांवर गुन्हाही नोंदवण्यात आला.


राजस्थानमध्ये गुन्हा दाखल

या प्रकरणी दोघांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंदवण्याबाबत काही संघटनांनी वरळी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती. मात्र, दोघांवर राजस्थानमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून संदर्भ एकच असल्याचे कारण देत पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे अॅड. नवनीत भोजने यांनी भोईवाडा न्यायालयात या दोन्ही कलाकारांवर गुन्हा नोंदवण्यात यावा, याबाबात पीआयएल दाखल केली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा