Advertisement

अभिनेता अभिषेक देशमुखही अडकला लग्नबंधनात


अभिनेता अभिषेक देशमुखही अडकला लग्नबंधनात
SHARES

२०१७ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीत विवाहबंधनाची जणू लाटच पसरली होती. अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी अापल्या संसाराची लगीनगाठ बांधली होती. अाता २०१८ च्या सुरुवातीला अाणखी एक मराठी अभिनेता विवाहबंधनात अडकला अाहे. 'पसंत अाहे मुलगी' या मालिकेत झळकलेला अभिनेता अभिषेक देशमुख यानं नुकतंच अापली मैत्रीण कृतिका देव हिच्यासोबत लग्न केलं अाहे. सोशल मीडियाद्वारे त्याने ही बातमी अापल्या चाहत्यांना दिली अाहे.


कृतिका झळकली अाहे अनेक चित्रपटांत

अभिषेक अाणि कृतिका यांनी एकत्र या चित्रपटात काम केले नसले तरी कृतिकाच्या अनेक भूमिका गाजल्या अाहेत. कृतिकाने राजवाडे अँड सन्स, हॅप्पी जर्नी, हवाईजादा यांसारख्या चित्रपटांत काम केले अाहे. 'प्रेम हे' ही तिची मालिका खूप गाजली होती. अभिषेक 'पसंत अाहे मुलगी' या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला अाला होता.


रजिस्टर मॅरेजचा दोघांचा निर्णय

लग्नावर उधळपट्टी न करता राजवाडे अँड सन्स फेम अभिनेत्री कृतिका देव अाणि अभिषेक यांनी रजिस्टर मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता. ६ जानेवारीला मोजके नातेवाईक अाणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा