Advertisement

अशोक सराफ बनले ‘लव्हगुरू’

कॉमेडी आणि रोमान्सचे गुरू असलेले अशोक सराफ ‘हृदयात समथिंग समथिंग’ या आगामी मराठी सिनेमात लव्हगुरूच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अशोक सराफ बनले ‘लव्हगुरू’
SHARES

७० ते ९०च्या दशकात मराठी सिनेमांमध्ये रोमँटिक भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ‘हृदयात समथिंग समथिंग’ या आगामी मराठी सिनेमात लव्हगुरूच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटातल्या अशोक सराफ यांच्या भूमिकेचं पोस्टर नुकतंच लाँच झालं आहे.


लव्हगुरूकडून टिप्स 

‘हृदयात समथिंग समथिंग’ या सिनेमाचं दिग्दर्शन प्रविण राजा कारळे यांनी केलं असून ते अशोक सराफ यांच्या भूमिकेबाबत सांगतात की, अशोकमामा त्यांच्या कॉमिक टाइमिंगसाठी ओळखले जातात. या धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपटाव्दारे लव्हगुरू झालेल्या अशोकमामांकडून टिप्स ऐकायला मिळणं खूप मनोरंजक असेल.


कॉमेडी, रोमान्सचे गुरू

अशोक सराफ यांच्या भूमिकेविषयी चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणतात की, कॉमेडीचा बादशाह अशी अशोक सराफ यांची ओळख आहे. जवळजवळ तीन दशकं आपण मराठी सिनेमांतून त्यांचा रोमान्सही पाहत आलोय. अशावेळी कॉमेडी आणि रोमान्स दोन्हीचे गुरू असलेल्या अशोक सराफ यांना या मॅड कॉमेडी सिनेमातून ‘लव्ह गुरू’च्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशाही जैन व्यक्त करतात.


५ ऑक्टोबरला प्रदर्शित

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण आणि अतुल गुगळे यांची निर्मिती असलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियंका यादव, भूषण कडू या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा ५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.



हेही वाचा -

'माल्टा'मध्ये भरणार ‘माल्टा-इंडिया फिल्म फेस्टिव्हल’

‘बॉईज’ सिनेमाचा येणार सिक्वेल



 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा