Advertisement

कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा; मुंबई पोलिसांना कोर्टाचे आदेश

कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघींवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश वांद्रे न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा; मुंबई पोलिसांना कोर्टाचे आदेश
SHARES

मागील अनेक दिवसांपासून बाॅलिवूडवर असंख्य खळबळजनक आरोप करणारी वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधीच मुंबई महापालिकेविरोधात न्यायालयात लढणारी कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघींवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश वांद्रे न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. (bandra court orders mumbai police to register FIR against bollywood actress kangana ranaut)  

बाॅलिवूडमधील घराणेशाही, ड्रग्ज कनेक्शन एवढंच नाही, तर हिंदू-मुस्लिम लाॅबी अशा अनेक मुद्द्यावर सोशल मीडियावरून नको तेवढे आरोप कंगनाने मागील काही दिवसांमध्ये केले आहेत. तिच्या याच आरोपांवर आक्षेप घेत मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैयद यांनी कंगनाविरुद्ध वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोघांनीही आधी वांद्रे पोलिसांत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्यावर त्यांनी वांद्रे न्यायालयात धाव घेतली.

कंगना रणौत सातत्याने टीव्ही, सोशल मीडिया या माध्यामांतून बॉलिवूडविरोधात बोलत आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून बॉलिवूडवर टीका करतानाच ती हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे ट्विट देखील हिंदू-मुस्लिम समुदायात धार्मिक तेढ निर्माण करणारे आहेत. यामुळे मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडिओ सादर केले. त्यानंतर न्यायालयाने कलम १५६ (३) अंतर्गत कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

दरम्यान, 'बॉलिवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत,' अशा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडविरोधात कट रचणाऱ्यांना दिला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा