Advertisement

‘बिग बॉस’मध्ये पुढील कॅप्टनसीचं कार्य काय?

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये गुरुवारी पार पडलेल्या ‘होऊ दे चर्चा’ या साप्ताहिक कार्यानुसार पुष्कर, आस्ताद, मेघा आणि सई यांनी बऱ्याच ब्रेकिंग न्यूज दिल्या. या टास्कमध्ये आऊनी अनिल थत्ते आणि त्यांच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज दिली. तसंच पुष्करने त्याच्या चाहत्यांसाठी एक छान नृत्य केलं. टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सई बरोबर शाब्दिक चकमक झाली.

‘बिग बॉस’मध्ये पुढील कॅप्टनसीचं कार्य काय?
SHARES
कॅप्टनमध्ये किती सहनशीलता आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात हे महत्व अधोरेखित करण्यासाठी शुक्रवारच्या भागात बिग बॉस घरातील सदस्यांना ‘एक डाव नावाचा’ हे कॅप्टनसीचं कार्य सोपवणार आहेत. कॅप्टन या शब्दाचं महत्व अधोरेखित करणं हे या कार्याचं उद्देश आहे. कोण बनणार बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन? मेघा आणि सई यांच्यात कडाक्याचं भांडण होणार का? हे आजच्या भागात पाहायला मिळेल.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा