कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये काल दोन टास्क रंगल्या. सदस्यांना बिग बॉसमध्ये येऊन आता ७० दिवस झाले. याच अंदाजाचा आणि कल्पकतेचा आधार घेऊन आपली क्रमवारी सदस्यांना ठरवायची होती. सदस्यांच्या चांगल्या कृत्याची बाहेरच्या जगात दखल घेतली गेली असेल किंवा एखाद्या कृत्याची सनसनाटी बातमी झाली असेलच. तर सदस्यांना त्यांच्यापैकी अशा पाच सदस्यांची क्रमवारी ठरवायची होती. यानुसार रेशम पहिल्या क्रमांकावर, मेघा, पुष्कर, सई आणि अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर उभे राहिले.
बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना ‘होऊ दे चर्चा’ हे साप्ताहिक कार्य सोपवलं. ज्यामध्ये आस्ताद मंगळावार पोहचला, तर पुष्करने बिकिनी घातली. आऊ आणि शर्मिष्ठाने मोठं भांडण झाल्याचं दाखवलं. यानुसार मेघा आणि रेशमनं पुष्कर आणि आस्तादला सगळ्यात जास्त सनसनाटी आणि ब्रेकिंग न्यूज दिल्याचं सांगितलं. त्यांनतर पुष्कर रिपोर्टर आणि आस्ताद कॅमेरापर्सन बनला. बुधवारी कोण बाजी मारणार? हे पाहायचं आहे.
बुधवारी ‘होऊ दे चर्चा’ या टास्कमध्ये सई आणि स्मिता, नंदकिशोर, पुष्कर आणि नंदकिशोर हे ब्रेकिंग न्यूज देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सईचे फोटो कोणीतरी लपवल्यानं ती आस्ताद, स्मिता यांना विचारणार आहे. ज्यावरून सई आणि स्मितावर खूप भांडण होणार आहे. तसंच सई नंदकिशोर यांच्या डोक्यावर पीठ टाकणार आहे. मेघा नंदकिशोर यांच्या डोक्यावर अंडी फोडणार आहे.
सईचं म्हणणं आहे की, “जे काही तुम्ही घरात आल्यापासून वागलात आणि बोललात तसंच तुम्ही टास्कमध्ये माणुसकी सोडून वागलात ते मला आवडलेलं नाही... आणि तुम्हाला ते मान्य देखील नसल्यामुळे मी हे सगळं केलं”.
पुष्कर जोग या टास्कसाठी व्हॅक्सिंग करणार आहे. त्याचं म्हणणे असं आहे की, “मला स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागतात, किंबहुना सगळ्या वेदना त्यांच्याच नशिबी आल्या आहेत. त्यामुळे त्यांना ज्या वेदना होतात त्याला माझ्या पायावरचे केस व्हॅक्स करून आज मी एकप्रकारे ट्रीब्युट देणार आहे.”
‘होऊ दे चर्चा’ या साप्ताहिक कार्यामध्ये जो जास्तीत जास्ती ब्रेकिंग न्यूज देणार त्या सदस्यांना या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे कोणाला ही सुवर्णसंधी मिळते ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.