Advertisement

'सुपर डान्सर -2'चा विजेता ठरला बिशाल शर्मा


'सुपर डान्सर -2'चा विजेता ठरला बिशाल शर्मा
SHARES

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 2 या सुपरहिट डान्स रिअॅलिटी शोच्या विजेतेपदाचा मानकरी आसामचा बिशाल शर्मा ठरला आहे. त्याला एकूण १२ लाख मतं मिळाली. सुपर गुरू शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बसू यांनी बिशालला 'डान्स का कल' हा खिताब दिला. हा खिताब मिळवण्यासाठी बिशालला ऋतिक दिवाकर, वैष्णवी प्रजापती आणि आकाश थापा यांचा सामना करावा लगाला.


१५ लाखांचं मिळालं बक्षीस

१२ वर्षीय बिशालला सपुर डान्सरच्या ट्रॉफीसोबत १५ लाख रुपये आणि पीसी ज्वेलर्सकडून एक विशेष भेटवस्तू देण्यात आली. तर बिशालचे गुरू वैभव घुगे यांना ५ लाखांचा धनादेश देण्यात आला. या फिनालेची खासियत म्हणजे यामध्ये प्रेक्षकच परिक्षक बनले होते आणि परिक्षक प्रेक्षक बनले होते. यावेळी मतदानाचे परिणाम वेळोवेळी जाहीर करण्यात येत होते. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या स्पर्धक कोणत्या स्थानावर आहे, हे कळत होतं. यावेळी भारतभरातील परिक्षक सोनी लाईव्ह अॅपवर आपलं मत नोंदवत होते.


या स्पर्धेसाठी १२ नर्तकांची निवड

सुपर डान्सरच्या डान्स का कल या स्पर्धेसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट १२ नर्तकांची निवड करण्यात आली होती. अटीतटीच्या या स्पर्धेत अखेर आकाश थापा, बिशाल शर्मा, ऋतीक दिवाकर आणि वैष्णवी प्रजापती यांची फिनालेसाठी निवड करण्यात आली. अभिनेता वरूण धवन हा त्याच्या आगामी सिनेमा अॉक्टोबरच्या प्रमोशनसाठी सुपर डान्सरच्या फिनालामध्ये आला होता.

सुपर जान्सर 2 मध्ये डान्स का कल ही ट्रॉफी जिंकल्यामुळे मी खूप खुश आहे. मी माझे परिक्षक, माझे नृत्यदिग्दर्शक आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा खूप आभारी आहे. या सर्वांच्या मदतीने आणि मार्गदर्शनामुळेच मी हे विजेतेपद मिळवू शकलो. आणि आज माझ्या आई-वडिलांना माझा खूप अभिमान वाटेल.
- बिशाल शर्मा, विजेता

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा