Advertisement

'पीपली लाईव्ह'चे अभिनेते सीताराम पांचाळ यांचे निधन


'पीपली लाईव्ह'चे अभिनेते सीताराम पांचाळ यांचे निधन
SHARES

बँडिट क्वीन (1995), 'स्लमडॉग मिलिनेयर'(2009), 'पीपली लाइव्ह'(2010), 'पान सिंह तोमर' (2012) आणि 'जॉली एलएलबी' (2013) यांसारख्या चित्रपटात अभिनय केलेले अभिनेते सीताराम पांचाळ यांचे निधन झाले.


गेल्या चार वर्षांपासून ते फुफ्फुस आणि मुत्रपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांना श्वसनाचाही त्रास होता. पण अखेर गुरुवारी सकाळी 8.30 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आजारामुळे त्यांचे वजन कमी होऊन 30 किलोवर आले होते.



उपचारासाठी नव्हते पुरेसे पैसे

जीवघेण्या कँसरच्या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाच्या फेसबुकवर एक पोस्ट टाकून लोकांना मदतीसाठी आवाहन केले होते. पण दिवसेंदिवस आजारासाठी लागणारा खर्चही वाढतच जात होता. आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांनी आयुर्वेदिक उपचार सुरू केला.



अभिनेता इरफान खान, पांचाळ यांचे मित्र संजय मिश्रा, रोहिताश गौड, टीव्ही प्रोड्यूसर (एक घर बनाऊंगा) राकेश पासवान यांसारख्या कलाकारांनी त्यांना आर्थिक मदत दिली होती.

पांचाळ यांना हरियाणा भाषेतील अश्विनी या चित्रपटात उत्तम अभिनय केल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.

सीताराम पांचाळ यांचा जन्म हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील डूंडर हेडी या गावात 1963 मध्ये झाला होता. पांचाळ हे त्यांच्या कुटुंबियांत एकटेच कमावणारे होते. त्यांना 19 वर्षाचा एक मुलगाही आहे. जो सध्या शिक्षण घेत आहे.



हेही वाचा - 

अभिनेता इंदर कुमार यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा