बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांचा आवाज भारतीय प्रेक्षकांसाठी खूप खास आहे. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या आवाजाचे देखील बरेच चाहते आहेत. आता हाच आवाज तुम्हाला अॅमेझॉनचे खास प्रॉडक्ट असलेल्या अलेक्सा या डिव्हाइसवर ऐकता येणार आहे.
आता बिग बी म्हणजेच खुद्ध अमिताभ बच्चन आपला आवाज अलेक्सा या डिव्हाईसला देणार आहेत. अलेक्सामध्ये बच्चन यांचा आवाज पुढील वर्षांपासून आपल्याला ऐकायला मिळेल अशी माहिती अमेझॉन अलेक्साचे भारतातील प्रतिनिधी पुनिष कुमार यांनी दिली आहे आहे.
अमेझॉनच्या अलेक्सामध्ये बिग बी यांच्या आवाजात जोक, हवामानाच्या बातम्या, शायरी, मोटिवेशनल कोट्स अशा बऱ्याच गोष्टीचा खजिना असणार आहे. यासाठी अलेक्साची टीम बच्चन यांच्याबरोबर काम करणार आहे. ते कसे बोलतात? तसंच त्यांच्या बोलण्यातील उच्चार या सर्वाचा बारकाइनं अभ्यास करून ग्राहकांपर्यं त्यांचा आवाज पोहचवण्यात येईल.
मी नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. या वेळी अॅमेझॉन बरोबर अलेक्साचा आवाज होण्यासाठी मी खुप उत्सुक आहे. त्यामुळे माझ्या हितचिंतकांना आणि फॅनसना हा नवीन प्रयोग नक्की आवडेल अशी मी अशा करतो. सोमवारी झालेल्या कार्यक्रमावेळी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अलेक्सा हे डिव्हिइस अलेक्स फायर टीव्ही स्टिक, अलेक्सा टीव्ही रिमोट फायर टीव्ही याडिशन, अॅमेझॉन अॅप आणि अलेक्सा अॅप तसंच मोबाइल फोन, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट टीव्ही हेडफोन्स अशा थर्ड पार्टी डिव्हाइसमध्ये सुद्धा सपोर्ट करते.
अमेरिकेमध्ये अलेक्सासाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी आपला आवाज दिला आहे. त्यामध्ये सॅम्युएल जॅक्सन यांनी आवाज दिला आहे. मात्र बॉलीवूडमध्ये हा प्रयोग प्रथम अमिताभ बच्चन याना घेऊन करण्यात येणार आहे.
हेही वाचा