'बिग बॉस'चं घर म्हणजे जणू एक भावनिक चक्रव्यूहच आहे. त्यामुळेच घरातील सदस्य कधी क्षणात रागावतात, तर कधी तर भावूक होतात. अशाच एका क्षणी किशोरी शहाणेंना अश्रू अनावर झाले.
'बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या पर्वात बरेच किस्से घडत आहेत. वादविवादांच्या जोडीला काही भावूक क्षणही पहायला मिळत आहेत. चुकणाऱ्या सदस्याचा महेश मांजरेकर कान धरत आहेत. 'बिग बॉस'च्या घरातील माईंड गेम ज्याला समजला, तो जास्त काळ या घरात टिकला हे या खेळाचं जणू गमकच आहे. पहिल्या दिवसापासून सावधगिरीनं पावलं टाकणाऱ्या किशोरी शहाणेंच्या सहनशीलतेचा बांध अखेर फुटला आणि त्यांना अश्रू अनावर झाल्याचं आज पहायला मिळेल.
राग, प्रेम, तिरस्कार, हसू आणि रडू यांच्यासह १०० दिवस एका घरामध्ये रहाणं सोपी गोष्ट नक्कीच नाही. या १०० दिवसाच्या कालावधीमध्ये सदस्य या घरामध्ये प्रत्येक गोष्ट अनुभवतात. टास्क दरम्यान प्रत्येक सदस्याची कसोटी लागते. हा टास्क सदस्य कसा पूर्ण करतात हे महत्वाचं असतं, पण यामध्ये कधी कधी घरातील इतर सदस्य दुखावलेही जातात. 'चोर बाजार' या टास्क दरम्यान किशोरी शहाणे आणि शिवानी सुर्वे यांच्यात वाद झाला. किशोरी यांनी शिवानीला सायकोही म्हटलं. त्यावर 'किशोरी शहाणे असतील ते त्यांच्या घरी, माझ्यासमोर आवाज नाही करायचा', अशा शब्दांत शिवानीनं त्यांना उत्तर दिलं.
किशोरी शहाणे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत. त्यामुळेच घरातील बाकी सदस्यांना त्यांचा आधार वाटतो आहे, पण 'बिग बॉस' यांनी दिलेल्या चोर बाजार या टास्क दरम्यान शिवानी आणि किशोरीमध्ये वाद झाला. या टास्क दरम्यान त्यांचं सामान उध्वस्त केलं, त्यांना टार्गेट केलं या गोष्टीचं किशोरी यांना खूप वाईट वाटलं. आपल्या मनात काय आहे हे त्यांनी बिचुकलेंना सांगितलं. बिचुकलेंनी किशोरींना धीर द्यायचा प्रयत्न केला. 'आताच्या आता १४ सदस्यांना तुमचं काय दु:ख आहे ते सांगतो आणि किशोरींचं काही सामान असेल ते त्यांना देऊन टाका असं मी त्यांना सांगतो', असं बिचुकले म्हणाले. मैथिलीनंही किशोरी यांना समजवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा -
ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन
‘बिग बॉस’मध्ये भरणार चोर बाजार!