Advertisement

#MeeToo मुळे खलनायकांचा ‘थरथराट’!

सुधीर मिश्रा दिग्दर्शित एका आगामी चित्रपटात एक अभिनेत्रीवर खलनायक साकारत असलेले दलीप ताहील बलात्कार करत असल्याचा सीन करायचा होत., मात्र #MeeToo चळवळीमुळे ताहीलनी दिग्दर्शकाला असा सीन करायला साफ शब्दात नकार दिला.

#MeeToo मुळे खलनायकांचा ‘थरथराट’!
SHARES

देशभरात सुरू असलेल्या #MeeToo चळवळीमुळे अनेक बड्या हस्तींचे खोटे मुखवटे गळून पडत असून, त्यांचा बीभत्स करणारा खरा चेहरा जगासमोर येत आहे. पण यामुळे आॅनस्क्रीन खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा मात्र थरथराट झाला आहे.


बलात्कार सीनला नकार 

स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या #MeeToo चा फटका अनेक दिग्गजांना बसत आहे. बॅालीवूडमध्ये या चळवळीने जणू रानच उठवलं आहे. असं असताना काही कलाकार मात्र सावधगिरी बाळगत खलनायकी भूमिकाही काळजीपूर्वक साकारत आहेत. ‘दुधाने तोंड भाजलेला जसा ताकही फुंकून पितो’ तशी खलनायकी भूमिका साकारणाऱ्या दलीप ताहील यांनी #MeeToo चा धसका घेत आॅनस्क्रीन बलात्काराचा सीन करण्यास चक्क नकार दिला.


अभिनेत्रीकडून लेखी घेतलं

सुधीर मिश्रा दिग्दर्शित एका आगामी चित्रपटात एक अभिनेत्रीवर खलनायक साकारत असलेले दलीप ताहील बलात्कार करत असल्याचा सीन करायचा होत., मात्र #MeeToo चळवळीमुळे ताहीलनी दिग्दर्शकाला असा सीन करायला साफ शब्दात नकार दिला. यावर दिग्दर्शक मिश्रा यांनी तोडगा काढत जिच्यावर बलात्कार करायचा सीन चित्रीत करायचा होता त्या अभिनेत्रीकडून दलीप ताहील यांनी बलात्कार करावयाच्या सीनमध्ये काहीही त्रास दिला नाही, हे लिहून घेतलं. त्यानंतर हा सीन २०० जणांच्या समोर चित्रीत करायला ताहील तयार झाले.



हेही वाचा -

माझ्यासोबत कोणी चुकीचं वागून पळून जाऊ शकत नाही - लता मंगेशकर 

बॉलीवूडवर सलमान-दीपिकाचंच राज्य!




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा