'बिग बॉस' हा नेहमीच वादग्रस्त शो म्हणून प्रसिद्ध आहे. या घरात कधी कोणाचं प्रेम ऊतू जातं, तर कधी रागात एकमेकांचे गळेही धरले जातात. सध्या 'बिग बॉस ११' मध्येही हे आपल्याला पाहायला मिळतंय. या शोचे काही किस्से आपल्याला फक्त वायाकॉम १८ वूटवर 'अनसिन अनदेखा' मध्ये पाहायला मिळतात. नुकतंच 'अनसिन अनदेखा'च्या व्हीडिओमध्ये घरातील स्पर्धक हिनाने चक्क गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला. हिना खान ही बिग बॉसच्या घरात येण्याआधी एका रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. त्यात ती तिच्या सुमधूर आवाजासाठी चांगलीच प्रसिद्ध झाली होती.
वायाकॉम १८ वूटवर दाखवल्या जाणाऱ्या 'अनसिन अनदेखा'मध्ये हिनाने आपल्या आवाजाने घरातील इतर सदस्यांना खूश केलेलं पाहायला मिळालं. पण तिचं हे टॅलेंट तिला घरात टिकून राहण्यासाठी उपयोगाचं ठरेल का? हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.
'अनसिन अनदेखा' हा एपिसोड पाहण्यासाठी खालच्या लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/0B0nEUWjwe1KKWS11NWJwQndqNnc/view
हेही वाचा