Advertisement

प्रेमाची हटके स्टोरी सांगणारा 'फुगे'


प्रेमाची हटके स्टोरी सांगणारा 'फुगे'
SHARES

मुंबई - दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी लवकरच त्यांच्या आगामी 'फुगे' या मराठी सिनेमातून प्रेमाची हटके स्टोरी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. या स्टोरीत स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे हे मराठी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचा सोशल साईटवर नुकताच टीजर पोस्टर लाँच करण्यात आला. या टीजर पोस्टरला सोशल साईटवर तुफान प्रसिद्धी मिळत आहे. एस.टी.व्ही.नेटवर्क या निर्मिती संस्थेअंतर्गत हा चित्रपट प्रदर्शित होतोय. कार्तिक निशानदार आणि अर्जुन बऱ्हाण यांच्या जीसिम्स स्टुडियोजचाही यात वाटा आहे.

या टीजर पोस्टरमधील एक गम्मत म्हणजे सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या आडनावात केलेला बदल. पोस्टरवर स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी असा घोळ झालेला दिसून येतोय. पण हा घोळ जाणूनबुजून करण्यात आलाय. स्वप्नील आणि सुबोध या दोघांनी आपापल्या ट्विटर अकाउंटच्या नावाचेही नामकरण केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा