दादर - शुक्रवारी शिवसेनेनं आयोजित केलेल्या 'सांज स्वरांची' या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली स्टेजची सजावट प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली. या स्टेजची बांधणी कल्पकतेनं करण्यात आली होती. स्टेजवर करण्यात आलेल्या सजावटीचं प्रतिबिंब पाण्यात दिसत होतं. त्यामुळे गायनाच्या मैफलिची शोभा अधिकच वाढली.