मस्जिद बंदर - माऊली प्रतिष्ठान आयोजित मांडवी महोत्सव - 2017 ची सांगता सोमवारी रात्री झाली. या वेळी विविध खेळ आणि स्पर्धा घेण्यात आल्या. यात मुलामुलींचे मैदानी खेळ, होम मिनिस्टर, हळदी कुंकू समारंभ, अंध मुलांचे मल्लखांब प्रात्यक्षिक, लहान मुलामुलींचे सोलो-ग्रुप डान्स आणि सर्वात शेवटी लकी ड्रॉ काढून विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. 30 जानेवारीला सायंकाळी 6.30 ते 10.00 दरम्यान झालेल्या कार्यक्रमाचं आयोजन मारुती लोटळ, सुनिल खैर, चिराग दोशी यांनी केलं. या कार्यक्रमाला विभागातील जवळपास 300 हून अधिक महिला उपस्थित होत्या.