'सेक्रेड गेम्स'चा पुढचा सीझन कधी येणार हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून चाहत्यांना सतावत होता. चाहत्यांची ही प्रतीक्षा दूर करत नेटफ्लिक्सने 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा सीझन १५ आॅगस्टला रिलीज होणार असल्याची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत अकाऊंटवर ‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलरही प्रदर्शित केला आहे. त्यामुळे 'कभी कभी लगता है अपुन ही भगवान है' असं म्हणणारा 'सर्वसक्तीसाली' गणेश गायतोंडे परतणार असल्याने सोशल मीडियावर 'सेक्रेड गेम्स'च्या चर्चांना उधाण आलं आहे.
Calendar nikalo bhaiyo aur behno. #SacredGames2 ka release date ayela hai!https://t.co/zQLxJ1q4Yd
— Netflix India (@NetflixIndia) July 9, 2019
या ट्रेलरमध्ये ‘जंग का वक्त आ गया है’, ‘लाईफ हराम हो गयी थी सरदारजी अब आपली हराम होगी’, असं म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देताना दिसत आहे. पहिल्या सीझनमधील कलाकारांसोबत ट्रेलरमध्ये कलकी कोचलीन आणि रणवीर शौरी हे दोन नवे चेहरेदेखील पाहायला मिळत आहेत.
या सीझनमध्ये नेमकी कोणती 'जंग' दाखवली जाईल? क्या ये दुनिया बचने के लायक है, असं का म्हणण्यात आलं आहे? गुरूजीचा या सर्वांच्या पाठिमागे नेमका काय हात आहे? कुणाचं बलिदान द्यावं लागेल? २५ दिवसात नेमकं काय घडणार आहे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या १५ ऑगस्टला चाहत्यांना मिळणार आहेत.
हेही वाचा-
संजूच्या मराठी 'बाबा'चा पहिला टीझर प्रदर्शित