मुंबई - बच्चे कंपनीसाठी डिसेंबर महिना म्हणजे फुल ऑन धमाल आणि एडव्हेंचर फुल असणार आहे. चिमुकल्यांचे खास आवडीचे भीम आणि माईटी राजू यांच्यासोबत अप्पू हा नवा मित्रही पोगोवर दाखल होणार आहे. खास ख्रिसमसनिमित्त पोगो चॅनेलवर डिसेंबर महिन्यात 2 नवीन सिनेमे आणि एक शो दाखवला जाणार आहे. पॉवर पॅक्ड एपिसोड्, नवीन कॉन्टेस्ट आणि यावर्षीचे सर्वात मोठे ब्लॉकबस्टर आपल्या बच्चे कंपनीसाठी. शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस नवीन शोची अर्थात अप्पू-दि योगिक एलिफंट धूम पोगोवर असेल. हा शो प्रत्येक वीकेंडला सकाळी 8.30 वाजता दाखवला जाणार आहे.
सुपर भीम आणि त्याचे मित्र मुलांसाठी एक नवा सिनेमा घेऊन येतायत. सुपर भीम- फायर अॅंड आईस. याचा प्रिमियर 25 डिसेंबरला सकाळी 10.30 वाजता रिलीज होणार आहे. आगीचा राजा आणि राणी यांची रोमांचकारी अॅक्शन यात पाहायला मिळणार आहे. स्नो क्वीनला फायर प्रिन्सला बंदिस्त करायचं असतं, आणि त्या जागी ती स्काय ड्रॅगनला फ्रिज करते. तेव्हा भीम आणि त्याचे मित्र प्रिन्स आणि स्काय ड्रॅगनला कसे वाचवतात अशी मजेशीर कहानी भीमच्या फॅन्सला पाहायला मिळणार आहे.
यासोबतच पोगोच्या माईटी बच्चेकंपनीसाठी माईटी राजूचा लाईट ऑफ एस्ट्रोम हा नवा सिनेमाही येतोय. सिनेमाचे प्रिमियर 31 डिसेंबर सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या फेस्टिव्ह सीझनमध्ये पोगोने हिट पिक्चर या संकल्पनेतून आपल्या प्रेक्षकांसाठी एक्साईटिंग सिनेमांची पर्वणी आणली आहे. या व्यतिरिक्त सिनेमांच्या दरम्यान काही कॉन्टेस्टही पोगोवर होतील, ज्या मार्फत मुलांना एक डिजीटल कॅमेरा जिंकण्याची संधी मिळणार आहे.