Advertisement

हा आहे ‘सर्वाधिक चर्चित सेलेब्रिटी विवाह’

प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनला आहे. प्रियांकानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दुसऱ्या स्थानी आहे.

हा आहे ‘सर्वाधिक चर्चित सेलेब्रिटी विवाह’
SHARES

आज केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे, तर सेलिब्रिटीजनाही सोशल मीडियाने चांगलंच पछाडलं आहे. कदाचित याच कारणामुळे सध्या सेलिब्रिटीजची लोकप्रियताही सोशल मीडियावरील लोकप्रियतेच्या परिमाणाने मोजली जात आहे. या परिमाणाच्या आधारे प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांचा विवाह सोहळा सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी विवाह ठरल्याचं चित्र समोर आलं आहे.


ग्लोबल आयकॉन

मागील काही दिवसांपासून सातत्याने प्रियांका चर्चेत आहे ती आपल्या विवाह सोहळ्यामुळे. या दरम्यान वर्तमानपत्रांपासून डिजीटल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी प्रियांकाचंच राज्य होतं. इंटरनॅशनल सिंगर निक जोन्ससोबत लग्न झाल्याने ग्लोबल आयकॉन बनलेल्या प्रियांकाच्या लोकप्रियतेत वाढ झाली असल्याचं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवरून लक्षात येतं.


बिग फॅट इंडियन वेडिंग

प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनला आहे. प्रियांकानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दुसऱ्या स्थानी आहे. जोधपुरमध्ये पारंपरिक पध्दतीने लग्न करण्यापासून मुंबईमध्ये रिसेप्शनपर्यंत तीन आठवडे चाललेल्या प्रियांकाच्या ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ने स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर नुकत्याच झालेल्या बॉलीवूड विवाहांमध्ये ‘सर्वाधिक चर्चित विवाह’ असण्याचा मान पटकावला आहे.


स्कोर ट्रेन्ड्सची अाकडेवारी

आंतरराष्ट्रीय मॅगझिन आणि मीडियाने प्रियांका-निकच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ चालवले. जे या अगोदरच्या बॉलीवूड लग्नांच्याबाबतीत कधीच घडलं नव्हतं. इतकंच नाही तर मुंबई झालेल्या रिसेप्शनचे फोटोसुध्दा सोशल मीडिया, डिजीटल आणि न्यूज प्रिंटमध्ये ट्रेंड झाले. यामुळेच दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या कव्हरेजला मागे टाकत प्रियांका-निकचं लग्न सर्वाधिक चर्चेत राहिलं. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.


१४ भाषांमधील माहिती

१४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्रोतातून ही माहिती गोळा केली जाते. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशनं, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे या माहितीवर प्रक्रिया करून बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचलं जातं.

मागील काही दिवसांपासून सातत्याने प्रियांका चर्चेत आहे ती आपल्या विवाह सोहळ्यामुळे. या दरम्यान वर्तमानपत्रांपासून डिजीटल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी प्रियांकाचंच राज्य होतं. इंटरनॅशनल सिंगर निक जोन्ससोबत लग्न झाल्याने ग्लोबल आयकॉन बनलेल्या प्रियांकाच्या लोकप्रियतेत वाढ झाली असल्याचं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवरून लक्षात येतं.


हेही वाचा - 

… आणि अमृता गहिवरली!

'सिंबा'च्या मागे ११ मराठमोळ्या कलाकारांची फौज




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा