Advertisement

‘बिग बॉस’चं बीबी हॉटेलमध्ये रुपांतर !


‘बिग बॉस’चं बीबी हॉटेलमध्ये रुपांतर !
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये सोमवारी ‘पैसा फेक तमाशा देख’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. कार्यानिमित्त घरामध्ये बैलगाडी ठेवण्यात आली. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारं हे कार्य होतं. सई बिग बॉसच्या घराची कॅप्टन असल्याने ती सुरक्षित होती.

नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये रेशम, आस्ताद आणि स्मिता नॉमिनेट झाले. तर मेघा, शर्मिष्ठा, पुष्कर हे या आठवड्यामध्ये सुरक्षित आहेत. तेव्हा पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल? कोणते टास्क सदस्यांना मिळणार? कोण सुरक्षित होणार? हे पाहणं रोमांचक ठरणार आहे.


पाहुण्यांचं अागमन

‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच विणा जगताप हे मंगळवारी बिग बॅासमध्ये येणार आहेत.  यासोबतच ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे कलाकारही बिग बॅासच्या घरातील पाहुणचार घेतील.


सई हॉटेलची मॅनेजर

आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. पाहुणचार करणं हे आपलं वैशिष्ट्य आहे. बिग बॉसमध्ये आलेल्या पाहुण्यांचं योग्य ते आदरातिथ्य व्हावं यासाठी बिग बॉसचं रूपांतर बीबी हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. सर्व सदस्यांनी मिळून हे कार्य करायचं असं बिग बॉस सांगणार असून, सई घराची कॅप्टन असल्याने या हॉटेलची ती मॅनेजर असेल.


पुष्कर करणार लावणी 

बीबी हॅाटेलमध्ये अतिथी म्हणून आलेल्या सचित पाटील आणि विणा जगताप यांची घरातील सदस्यांनी सेवा करायची आहे. याशिवाय सुरभी हांडे आणि ओमप्रकाश शिंदे यांचंही आदरातिथ्य करायचं आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन करण्यासाठी पुष्कर एक छान लावणी देखील सादर करणार आहे. अशा बऱ्याच घडामोडी आज बीबी हॅाटेलमध्ये घडणार आहेत.



हेही वाचा -

डेजी शाह स्कोर ट्रेंड्स इंडियावर नंबर वन!

गायिका अनुराधा पौडवाल, कुमार सानू यांचा ब्रिटिश संसदेत सत्कार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा