Advertisement

अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलमानच्या वडिलांचे प्रत्युत्तर

सलमान खानवर आरोप केल्यानंतर सलीम खान यांनी अभिनव कश्यपला प्रत्युत्तर दिलं आहे.

अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलमानच्या वडिलांचे प्रत्युत्तर
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा सर्नंवांनाच धक्का बसला. पण त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडची एक काळी बाजू सगळ्यांच्या समोर आली. अनेकांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाही जबाबदार असल्याचं म्हटलं. पण यामुळे बॉलिवूडमध्ये देखील दोन गट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

एकिकडे करण जोहरवर घराणेशाहीला खत-पाणी घातल्याचे आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे त्याच्या पाठोपाठ अभिनेता सलमान खानवर देखील अनेक आरोप होत आहेत. हे आरोप दुसरं तिसरं कुणी नाही तर दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप आहेत.  अभिनव कश्यपनं सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून सलमान खानवर धक्कादायक आरोप केले आहेत.

"बॉलिवूडमधील घराणेशाहीनं माझं शोषण केलं. ‘दबंग’सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतरही माझी आज ही अवस्था आहे. अरबाज खानला चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे होते म्हणून माझ्याकडून ‘दबंग 2’ काढून घेण्यात आला. याविरोधात मी आवाज उठवला. म्हणून त्यांनी इतर प्रोजेक्टही माझ्याकडून काढून घेतले. शिवाय मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली," असा आरोप अभिनवनं सलमान आणि त्याच्या कुटुंबावर लावला आहे.

अभिनवच्या या आरोपांवर सलमानचे वडील सलीम खान यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. अभिनवनं सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता.

सलीम खान म्हणाले, "या लोकांकडे दुसरे कोणतेही काम नाही. हे काहीही उलटं सुलटं बोलतील आणि त्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी, हेच यांना हवं असतं. माझ्या करिअरला ५० वर्षं झाली आहेत. हे कालचे आलेले प्रश्न विचारतात. एकच चित्रपट बनवला आणि दुसरा ऑफर केला तर त्याला नकार दिला. यानंतर यांच्यासोबत जे काही घडले त्याला आम्ही जबाबदार आहोत का? हे शक्य आहे का?", असा प्रश्न सलीम खान यांनी विचारला.

पुढे ते म्हणाले की, 'ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटशिवाय काहीही चालत नाही. आतील आणि बाहेरील व्यक्ती असं इथं काहीही नाही. फक्त हुशार असणं आवश्यक आहे. आणि हे जे म्हटलं जात की आऊटसाइडरला जास्त संघर्ष करावा लागतो, तो तर राज साहेब आणि दिलीप साहेबांनाही करावा लागला होता.'



हेही वाचा

सुशांत सिंह आत्महत्या : करण जोहर, सलमान खानसह ८ जणांविरोधात तक्रार दाखल


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा