Advertisement

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन


ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन
SHARES

मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. शुक्रवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जातानाच त्यांचं निधन झालं. शनिवारी वामन होवाळ यांचं पार्थिव कन्नमवारनगर मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. टागोरनगर इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय व्यवस्था राज्यमंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते.

वामन होवाळ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. कथाकथनासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदही भुषविले. मुळचे सांगली येथील तडसर मधील वामन होवाळ हे उच्च शिक्षणासाठी मुुंबईत आले. शालेय वयातच त्यांना लिखाणाची आवड निर्माण झाली.

वामन होवाळ यांची गाजलेले कथासंग्रह -

बेनवाडा, येळकोट, वाटा आडवाटा, वारसदार

'आमची कविता' हा कविता संग्रह वामन होवाळ यांनी संपादीत केला होता. वामन होवाळ यांच्या तीन कथा संग्रहांना राज्य सरकारचे उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार मिळालेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा